मल्ल्या देश सोडून जाणार हे जेटलींना आधीच माहिती होते; राहुल गांधींचा आरोप 

नवी दिल्ली – कोट्यवधी रुपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळलेला मद्यसम्राट विजय मल्ल्याने देश सोडण्याआधी अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केल्याचा दावा केला आहे. आता या मुद्यावरून विरोधी पक्षांनी अरुण जेटली यांना घेरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत अरुण जेटलींवर हल्ला चढविला. देश सोडून जाण्याच्या दोन दिवस आधी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये अरुण जेटली आणि विजय मल्ल्या यांच्यामध्ये पंधरा ते वीस मिनिटे चर्चा झाली होती, असा दावा करत राहुल गांधींनी अरुण जेटलींचा राजीनामा मागितला.

मल्ल्या आणि जेटली यांच्यामध्ये भेट झाली त्यावेळी काँग्रेस नेते पुनिया त्याठिकाणी उपस्थित असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. काँग्रेसचे नेते पुनिया म्हणाले कि, माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एका कोपऱ्यात उभे राहून त्या दोघांनी चर्चा केली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी जर खोटे बोलत असेन तर राजकारणातून संन्यास घेईल, असे पुनिया यांनी सांगितले.

अरुण जेटलींनी त्यांच्या ब्लॉगमधून आतापर्यंत झालेल्या सर्व बैठकांबद्दल माहिती देत असतात. पण याच भेटीबद्दल माहिती देणे त्यांनी का टाळले? अरुण जेटली खोटे बोलत आहेत, असा थेट आरोप राहुल गांधींनी केला आहे. मल्ल्या देश सोडून जाणार हे जेटलींना माहिती असताना त्यांनी सीबीआय, ईडी किंवा पोलिसांना याची माहिती का दिली नाही ? अटकेची नोटीस माहितीच्या नोटीसमध्ये कशी बदलली ? असे प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केले.

सरकार राफेल, विजय मल्ल्यावर खोटे बोलत आहे. अर्थमंत्र्यांना मल्ल्या पळून जाणार याची माहिती होती.  त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)