मल्ल्याविरोधात ईडीने फास आवळला 

उच्च न्यायालयाने फेटाळली याचिका

मुंबई – भारतातल्या बॅंकांना कोट्यवधी रूपयाचा गंडा घालणाऱ्या मद्यसम्राट विजय मल्ल्याला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. ईडीने मुंबईच्या पीएमएलए कोर्टात फरार घोषीत करण्यासाठी दाखल केलेल्या अर्जाला स्थगिती देण्याची विनंती करणारी याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सत्र न्यायालयाच्या पीएमएलए न्यायालयाच्या कारवाईत तूर्त आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असेही स्पष्ट केले. भारतातून पळ काढलेल्या मल्ल्या विरोधात ईडीने फास आवळण्यास सुरूवात केली.

आर्थिक गुन्हेगार कायदा 2018 नुसार विजय मल्ल्याला फरार घोषित करण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला. त्याला विरोधात करणारी याचिका मल्ल्याच्यावतीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. या याचिकेवर न्यायमूर्ती आर. एम. सावंत आणि न्यायमूर्ती व्ही. के. जाधव यांच्यासमोर सुनावणी झाली.

यावेळी मल्ल्याच्या वतीने ज्येष्ठ वकिल अमित देसाई यांनी युुक्तीवाद करताना आम्हाला कोणत्याही बॅंकेला फसवायचे नाही. कोणाचे पैसे बुडवायचे नाहीत. यासंदर्भात बॅंकांनी लवादाकडे दाखल केलेल्या अर्जावर 26 नोव्हेंबरला सुनावणी होण्याची शक्‍यता आहे. तर ईडीच्या अर्जावर जर पीएमएलए न्यायालयाने फरार आर्थिक गुन्हेगार 2018 या कायद्यानुसार फरार घोषीत केले तर तपासयंत्रणेला त्या व्यक्तीची सर्व खासगी मालमत्ता ताब्यात घेण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्यामुळे अन्य बॅंकांनाही त्याची झळ पोहचू शकते. त्यामुळे या कारवाईला स्थगिती द्यावी, अशी विनंती न्यायालयाला केली. तर ईडीने याला जोरदार विरोध केला. याची दखल घेऊन न्यायालयाने याचिकेत हस्तक्षेप करण्यास नकार देत याचिका फेटाळून लावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)