मल्ल्याला थांबवण्याची नोटीस कोणी बदलली?

राहुल गांधी यांनी थेट मोदींविषयीच उपस्थित केली शंका
नवी दिल्ली – सरकारी बॅंकांची अब्जावधी रूपयांची रक्‍क्‍म घेऊन विदेशात पळालेला विजय मल्ल्या हा पळून जाण्याची शक्‍यता आधीच व्यक्त करण्यात आल्याने सीबीआयने सर्व विमानतळांना नोटीस पाठवून तो पळून जाण्याच्या तयारीत असेल तर त्याला तेथेच अडकवून ठेवा अशी सुचना केली होती. पण नंतर सीबीआयची ही नोटीस बदलण्यात आली आणि अडकवून ठेवा ऐवजी आम्हाला केवळ माहिती द्या असा शब्दप्रयोग त्यात करण्यात आला.

सीबीआयने आपल्या नोटीशीत केलेला हा बदल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संमतीशिवाय केला असावा असे संभवत नाही असे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले असून मल्ल्याला पळून जाण्यास मोदींचीच मदत झाली असे त्यांनी याद्वारे सूचित केले आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की मल्ल्याच्या ग्रेट एस्केप साठी सीबीआयच्या नोटीशीतील डिटेन (अडकवून ठेवा )या शब्दात बदल करून त्याच्याविषयी केवळ इन्फॉर्म करा अशी सुधारणा यात करण्यात आली. सीबीआय हे थेट पंतप्रधानांना रिपोर्टिंग करणारे खाते आहे. त्यामुळे इतक्‍या महत्वाच्या बाबींविषयी सीबीआय स्वत:हून असा बदल करणे संभवत नाही.

सीबीआयने मल्ल्याच्या बाबतीत लुकआऊट नोटीशीत केलेला हा बदल पंतप्रधानांच्या संमती शिवाय झाला असावा असे म्हणणेही पटत नाही असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. मल्ल्याला लंडनला पळून जाण्यास मोदी सरकारकडूनच मदत झाली असा आरोप राहुल गांधी यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत केला होता व याबाबतीत अर्थमंत्री अरूण जेटली हे लपवालपवी करीत आहेत असे त्यांनी म्हटले होते. सध्या विजय मल्ल्या प्रकरणावरून भाजप आणि कॉंग्रेस मध्ये जोरदार आरोपप्रत्यरोप सुरू आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)