मल्ल्याला कर्जवाटप काँग्रेसच्या इशाऱ्यानेच : रविशंकर प्रसाद

भारतीय बँकांचे कर्ज बुडवून परदेशी फरार झालेल्या मल्ल्या याने आपण केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळामध्ये भूकंप झाला आहे. काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांकडून अर्थ मंत्री अरुण जेटली यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली जात आहे.
दरम्यान आता या प्रकरणावर केंद्रीय कायदे मंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला “विजय मल्ल्या याला काँग्रेस सरकारच्या काळातच कर्ज मंजूर करण्यात आली होती. २०१० मध्ये काँग्रेसच्या इशाऱ्यावरच स्टेट बँकेकडून विजय मल्ल्याला ‘अवैध’ कर्ज वाटप करण्यात आले होते.” असा आरोप देखील त्यांनी ट्विटरद्वारे केला आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)