मल्लिका झाली पिंजऱ्यामध्ये कैद

कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये बॉलिवूडच्या ऍक्‍ट्रेसेसनी जलवा दाखवायला सुरुवात केली आहे. प्रत्येक हिरोईनची वेगळी स्टाईल, ड्रेसिंग सेन्स, डिजाईन आणि फॅशन ट्रेन्ड बघायला मिळते आहे. इतर ऍक्‍ट्रेसच्या बरोबरीने मल्लिका शेरावतनेही कानमध्ये आपली हटके स्टाईल दाखवून दिली आणि मिडीयावाल्यांना आपल्याकडे आकर्षित करून घेतले. कानच्या रेड कार्पेटवर मल्लिकाचा जलवा तर लक्षवेधी ठरलाच. त्याशिवाय तिने एका एनजीओच्या कॅम्पेनसाठी केलेले फोटो शूटही चांगलेच गाजले. याशिवाय तिने स्वतःला चक्क एका पिंजऱ्यामध्ये बंद करून घेतले होते. तिच्या या पिंजऱ्यात बंद होण्यामागील रहस्य उलगडल्यावर मल्लिकाबाबतचा आदर आणखीनच वाढला आहे.

मल्लिका ही भारतातल्या “फ्रि ए गर्ल इंडिया’ची ब्रॅन्ड ऍम्बेसेडर आहे. ही संस्था बाल लैंगिक अत्याचारांच्या विरोधात आणि बालकांच्या तस्करीला रोखण्याच्या कामामध्ये सक्रिय आहे. या एनजीओसाठी मल्लिकाने केलेले कॅम्पेन म्हणजे बालकांच्या लैंगिक शोषणाविरोधात जनजागृती करण्याचा एक भाग होता. या एनजीओने सुरू केलेल्या कॅम्पेनचे नावच मुळात “लॉक मी अप’ असे आहे. त्या कॅम्पेननुसार मल्लिकाने स्वतःला 12 बाय 8 फूटांच्या एका छोट्याश्‍या पिंजऱ्यामध्ये बंद करून घेतले होते. तिच्या या कृतीमुळे सहाजिकच तिच्याकडे अधिक लक्ष वेधले गेले आणि त्यातून तिला अपेक्षित तो संदेशही मिडीयापर्यंत पोहोचवला गेला.

मल्लिकाने गेल्यावर्षीही याच एनजीओचे प्रतिनिधीत्व कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये केले होते. कान फेस्टिव्हलला हजेरी लावण्याची तिची ही नववी वेळ आहे. पिंजऱ्यात बंद झालेल्या मल्लिकाला बघून तरी इथल्या सेलिब्रिटीजना युवतींना कसे बळजबरीने वेश्‍याव्यवसायात ढकलले जाते याचा अंदाज येऊ शकेल. बाल वेश्‍यावृत्तीचा मुद्दा उपस्थित करण्यासाठी कान फिल्म फेस्टिव्हल हे एक चांगले आंतरराष्ट्रीय व्यासपीठ आहे, असे तिला वाटल्यानेच तिने या कॅम्पेनमध्ये भाग घेतला.

याशिवाय मल्लिका “स्कूल फॉर जस्टीस’ आणि “उर्जा’ या आणखी दोन एनजीओसाठीही सक्रिय असते. तिच्या ग्लॅमरचा अशाप्रकारे सदुपयोग करून घेण्याची तिची कल्पना ऐकल्यावर तिच्याबद्दलचा आदर वाढणार नाही का.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)