मल्टीफ्लेक्‍समधील व्यवस्थापकास मारहाण

पुणे,दि.29- मल्टीफ्लेक्‍समधील खाद्य पदार्थांचे दर जास्त का आहेत अशी विचारणा करत व्यवस्थापकास मारहाण करण्यात आली. हा प्रकार सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर आयकॉन मल्टीफ्लेक्‍समध्ये घडला. याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांविरोधा चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विनोदकुमार माळी (25,रा.पिंपळे-निलख) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार मनसेचे न माजी नगरसेवक किशोर शिंदे व इतर 10 ते 15 जणांविरुध्द मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
किशोर शिंदे हे त्यांच्या 10 ते 15 राजकीय कार्यकर्त्यांना घेऊन गुरुवारी दुपारी पीव्हीआर आयकॉन मल्टीफ्लेक्‍समध्ये घुसले. यानंतर त्यांनी खाद्यपदार्थ स्टॉल धारकांना खाद्यपदार्थांचे दर जास्त का आहेत याची विचारणा करण्यास सुरवात केली. वादावादी झाल्यानंतर फिर्यादी त्यांची समजूत घालत होते. मात्र त्यांचे कोणतेही म्हणणे न ऐकता त्यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक डि.एस.शिंदे तपास करत आहेत.
याप्रकरणी मनसेच्या वतीने सांगण्यात आले की, मल्टीफ्लेक्‍सचे मालक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालक करत नाहीत. येथे पाच रुपयांचे पॉपकॉर्न 250 रुपयांना विकले जाते. यापदार्थांचे दर कमी ठेवावेत अशा सूचना न्यायायाने दिल्या आहेत. यासंदर्भाती वृत्त आम्ही मल्टीफ्लेक्‍स व्यवस्थापकाला वाचायला दिले. मात्र त्याने मराठी येत नसल्याचे सांगितल्यावर त्याला हिसका दाखवला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)