मल्टीप्लेक्‍सच्या मनमानीच्या निषेधार्थ मनसेचे आंदोलन

पिंपरी – मल्टी प्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ मल्टीप्लेक्‍स नेण्यास परवानगी असताना देखील मल्टी प्लेक्‍समध्ये ते नेऊ दिले जात नाही. याच्या निषेधार्थ शहरातील विविध मल्टीप्लेक्‍समध्ये मनसेच्या वतीने शुक्रवारी (दि. 29) आंदोलन करण्यात आले. यावेळी बिग सिनेमाच्या बाहेरील फलक फाडण्यात आला. तसेच खाद्य पदार्थ विक्री स्टॉल मधील पॉपकॉन फेकत मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात राजू साळवे, हेमंत डांगे, अंकुश तापकीर, बाळा दानवले, दत्ता घुले, रूपेश पटेकर, अश्‍विनी बांगर, सीमा बेलापूरकर, संजय यादव आदी पदाधिकारी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मल्टीप्लेक्‍स बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकार तसेच मल्टीप्लेक्‍सच्या कारभारावर संताप व्यक्त केला आहे. प्रेक्षकांना बाहेरील खाद्यपदार्थ थिएटरमध्ये नेण्यास बंदी असेल तर मल्टीप्लेक्‍स मधील खाद्यपदार्थांची विक्री का थांबवत नाही, असा सवाल करत खंडपीठाने थिएटर मालक तसेच राज्य सरकारला सुनावले होते. एवढेच नव्हे तर अव्वाच्या सव्वा दराने विकले जाणारे हे पदार्थ सामान्य दरात विकले गेले पाहिजेत, असे मतही खंडपीठाने व्यक्त केले आहे. मल्टीप्लेक्‍समध्ये खाद्यपदार्थ छापील किंमतीपेक्षा जास्त दराने विकले जातात. तसेच बाहेरील खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेण्यास परवानगी देऊनही त्यास मल्टीप्लेक्‍स प्रशासनाकडून सुरक्षेचे कारण देत टाळाटाळ करण्यात येते. याच्या निषेधार्थ आज मनसेने आंदोलन केले.

यावेळी सचिन चिखले म्हणाले की, आज आम्ही शहरातील सर्वच चित्रपटगृहात जाऊन खाद्यपदार्थांची जादा दरातील विक्री बंद करण्याबाबत निवेदन दिले आहे. जर या मल्टीप्लेक्‍स व्यवस्थापनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, तर येत्या काळात मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन करण्यात येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)