मल्टिप्लेक्‍समध्ये स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाची मोहर

नवी दिल्ली – मल्टिप्लेक्‍स आणि चित्रपटगृहांमध्ये चित्रपटप्रेमींना स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्याच्या बंदीवर सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती मोहर लावली आहे. जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने या बाबतीत दिलेल्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. 18 जुलै रोजी जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने मल्टिप्लेक्‍स आणि चित्रपटगृहांच्या मालकांनी चित्रपटप्रेमींना स्वत:चे खाद्यपदार्थ नेण्यास बंदी करू नये असा निर्णय दिला होता, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

न्यायमूर्ती आर एफ नरिमन आणि न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने या बाबत अंतरिम निकाल देत उच्च न्यायालयचा निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली असून जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाल याचिका दाखल करणारे राज्य सरकार आणि वकील यांच्याकडून चार आठवड्यात स्पष्टीकरण मागितले आहे. अशी बंदी घालणारा एखादा कायदा आहे काय? असा प्रश्‍न खंडपीठाने वकिलांना विचारला.

-Ads-

वैधानिक कायदे केवळ चित्रपटांसाठी आहेत, खाद्यपदार्थांसाठी असा काही कायदा नाही. परंतु कायदा नसला म्हणून कोणताही खाद्यपदार्थ लोकांनी चित्रपटगृहात न्यावा असा अर्थ होत नाही, असा याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सिनेमाच्या तिकिटांवर स्वत:चे खाद्यपदार्थ चित्रपटगृहात नेऊ नयेत अशी सूचना असल्याचा उल्लेख याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला आणि ती पाळली पाहिजे अशी मागणी केली.

जम्मू-काश्‍मीर चित्रपट (नियमन) कायदा 1975चे पूर्णपणे पालन करावे असा निर्णय जम्मू-काश्‍मीर उच्च न्यायालयाने दिला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)