मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नाही- राज्य सरकार

नागपूर : मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. जर मल्टिप्लेक्स बाहेरील खाद्यपदार्थांवर बंदी घालत असेल, तर त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने विधीमंडळात  स्पष्ट केले आहे.

मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थ्यांच्या वाढीव किमती आणि बाहेरील खाद्यपर्थांवरील बंदीच मुद्दा आज विधीमंडळात चर्चेला आला. विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी विधानपरिषदेत याबाबत लक्षवेधी सादर केली. धनंजय मुंडे यांच्या लक्षवेधीला अन्न पुरवठा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी उत्तर दिले. राज्यातील मल्टिप्लेक्समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन जाण्यास बंदी नाही आणि मल्टिप्लेक्स मालकांनी असे केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.

याशिवाय एकाच वस्तूची दोन ठिकाणी वेगवेगळी किंमत असू शकत नाही. एक ऑगस्टपासून यासंबंधीचा केंद्राचा कायदा लागू होत आहे. अधिवेशनानंतर या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी बैठक घेणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी यावेळी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)