मलेशियात मीडियावर पोलादी पकड-खोट्या बातम्यांसाठी तुरुंगवासाची तरतूद

क्वालालम्पूर (मलेशिया) – मलेशियन सरकारने आज संसदेत एक विधेयक मांडले आहे. या विधेयकाने मीडियावर पोलादी पकड बसणार आहे. या विधेयकानुसार खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या संस्थांना जबरदस्त दंड आणि संबधित पत्रकारास 10 वर्षांपर्यंत तुरुंगवासाची तरतूद करण्यात आलेली आहे. देशात होणाऱ्या निवडणुकांच्या अगोदरच हे विधेयक मांडण्यात आलेले आहे.

कोणत्याही प्रकारच्या बिनबुडाच्या खोट्या बातम्यांच्या प्रसारणावर अंकुश ठेवणे आणि जनतेच्या हिताचे संरक्षण करणे हा या विधेयकाचा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. पूर्णत: वा अंशिक प्रकारे खोटी असलेली कोणतीही बातमी, आकडेवारी, अहवाल, फीचर्स, व्हिज्युअल्स आणि ऑडियो रेकॉर्डिंगचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. डिजीटल सामग्री आणि सोशल मीडियाचाही या विधेयकात अंतर्भाव करण्यात आल्याची माहिती सरकारने दिली आहे. मलेशियन नागरिकाच्या हितसंबंधाना प्रभावित करत असेल तर परदेशी नागरिकांवरही या कायद्याखाली कारवाई करता येणार आहे. या कायद्याने नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही, हे स्पष्ट करण्यात आलेले आहे.

मात्र विरोधी पक्षांनी अनावश्‍यक असल्याचे सांगत या विधेयकाला विरोध केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)