मलेशियात “नऊवारी लूक’मध्ये लोणावळ्याची सूनबाई झळकणार!

  • मिसेस इंडिया इंटरनॅशनल स्पर्धा : नुसरत शेख महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

लोणावळा – मिसेस इंडिया इंटरनॅशनल या देशपातळीवरील सौंदर्यवती स्पर्धेच्या अंतिम सामन्याकरिता महाराष्ट्रातून एकमेव निवड झालेल्या लोणावळ्यातील नुसरत परविन शेख या मलेशियात महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख असलेल्या नऊवारी साडीत सहभागी होत राज्याचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती इंडिया फॅशन फेस्टिवलच्या आयोजक एकता रुपानी व इंडियाचे सुपर मॉडल डायरेक्‍टर शब्बीर अली खान, रणरागिणी ग्रुपच्या संस्थापिका मंजुश्री वाघ यांनी पत्रकार परिषदेत दिली.

काश्‍मिरची कन्या व लोणावळ्याची सून अशी ओळख असलेल्या नुसरत शेख यांनी इंडिया फॅशन फेस्टिवल या संस्थेने आयोजित केलेल्या मिसेस इंडिया इंटरनॅशनल या स्पर्धेकरिता ऑनलाईन ऑडिशन दिली होती. योगायोगाने त्यांना सहभागाबाबत निमंत्रण आले. देशभरातील विविध राज्यातील 2340 सौंदर्यवतींनी या निवड चाचणीत सहभाग घेतला होता. त्यापैकी देशभरातील केवळ दहा महिलांची निवड “मिसेस इंडिया इंटरनॅशनल 2018′ स्पर्धेकरिता झाली आहे.
त्यामध्ये महाराष्ट्रातून लोणावळ्याच्या नुसरत शेख यांचा समावेश असल्याने लोणावळ्याचे नाव हे जगाच्या पाठीवर उमटणार आहे. 16 वर्षांपूर्वी लग्न होऊन लोणावळ्यात आलेल्या नुसरत शेख यांना एक मुलगी व दोन मुले आहेत. तसेच आई, दोन भाऊ असा परिवार आहे. काहीतरी करुन दाखविण्याची उमेद मनात धरुन त्यांनी इंडिया फॅशन फेस्टिवलची ऑनलाईन ऑडिशन दिली व त्यांना यशाचा मार्ग सापडला.

नुसरत म्हणाल्या की, मला रॅम्प वॉक व अन्य बाबींचा अनुभव नसल्याने सुरुवातीला मनात फार भीती होती; परंतु शब्बीर अली शेख व एकता रुपानी व त्यांच्या टिमने माझ्याकडून स्पर्धेची उत्तम प्रकारे तयारी करुन घेतली. फायनल करिता देखील पूर्ण क्षमतेने तयारी सुरू आहे.

शब्बीर शेख म्हणाले, नवीन मुले व मुली यांच्यापेक्षा महिलांमध्ये काहीतरी करुन दाखविण्याची उमेद जास्त जाणवते. यशाकरिता त्या प्रचंड मेहनत घेतात व त्याचा चांगला परिणाम तुमच्या समोर आहे. नुसरतच्या यशाने तिची आई, भाऊ व मुले ही भारावून गेली असून, अंतिम सामन्यात देखील ती विजयी होईल, असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्‍त केला.
एकता रुपानी म्हणाल्या की, इंडिया फॅशन फेस्टिवलचे डायरेक्‍टर रजत सुनेजा व आम्ही दरवर्षी या “फॅशन शो’चे आयोजन करतो. यामध्ये केवळ सौंदर्यच नव्हे तर बुद्धीमत्ता चाचणीसुद्धा घेत ब्युटी विथ ब्रेन या धोरणानुसार स्पर्धकांची निवड केली जाते. 1 जुलै रोजी मलेशियात या स्पर्धेचा अंतिम सामना रंगणार असून, सुप्रसिद्ध बॉलिवूड डायरेक्‍टर हसनेन हैदाबादवाला या स्पर्धेचे परीक्षण करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)