मलेशियातील दोन मोठे चिनी प्रकल्प रद्द करणार – महातीर मोहंमद

क्वालालम्पूर (मलेशिया) – चीनचे मलेशियात असलेले दोन मोठे प्रकल्प रद्द करणार असल्याचे सूतोवाच मलेशियाचे पंतप्रधान महातीर मोहंमद यांनी केले आहे. तीन महिन्यापूर्वीच मलेशियात पुन्हा सत्ता काबीज केलेल्या महातीर मोहंमद यांनी चीनच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी अब्जावधी डॉलर्सचे हे करार रद्द करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून चीनला हा एक धक्काच दिला आहे.

आपले सरकार देशावरील कर्जाचा बोझा कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे महातीर यांनी स्पष्ट केले आहे. चीनबरोबर चांगले संबंध असावेत असा आपला प्रयत्न आहे, त्यांच्या गुंतवणुकीचेही आम्ही स्वागत करतो; पण गॅस पाईप लाईन आणि पूर्व किनाऱ्यावरील रेल्वे लाईन हे दोन चिनी प्रकल्प व्यवहार्य नसल्याने त्यांची आम्हाला गरज आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.

माजी पंतप्रधान नजीब यांच्या काळात चीन-मलेशिया यांच्यात फार जवळिकीचे संबंध होते. सन 2016 मध्ये 688 किमी लांबीचा ईस्ट कोस्ट रेल लिंक प्रकल्प आणि दोन पाईप लाईन प्रकल्पांसाठी समझोता करार झाला होता. मात्र नवीन सरकारने चिनी प्रकल्पांचे काम अगोदच बंद केलेले आहे आणि त्यांच्यातील गुंतवणूक कमी करण्याचे जाहीर केले आहे.
जर हे प्रकल्प रद्द करता आले नाहीत, तर ते स्थगित तरी ठेवले जातील असे महातीर यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)