मलेशियाच्या माजी पंतप्रधानांवर कारवाई…

273 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जप्त
क्वालालम्पूर (मलेशिया) – मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्यावर केलेल्या कारवाईत 273 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जप्त आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पदभ्रष्ट झालेले मलेशियाचे माजी पंतप्रधान नजीब रज्जाक यांच्या सहा ठिकाणच्या निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यांमध्ये पोलीसांनी 273 दशलक्ष डॉलर्सची संपत्ती जप्त केली आहे.

नजीब यांच्या वेगळ्या सहा निवासस्थानांवर घातलेल्या छाप्यामध्ये रोख रकमेसह दागदागिने आणि मौल्यवान सामान जप्त करण्यात आले. जप्त केलेले सामान वाहून नेण्यासाठी पाच ट्रक्‍सची व्यवस्था करावी लागली. मलेशियाच्या इतिहासात जप्त करण्यात आलेली ही सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगण्यात आले आहे. रोख रकमेमध्ये 26 प्रकारची चलने मिळाली आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

1 एमडीबी या सरकारी कंपनीचे सुमारे 70 कोटी डॉलर्स (सुमारे 4,760 कोटी रुपये) आपल्या खात्यात जमा केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. चालू वर्षी झालेल्या निवडणुकीत नजीब रज्जाक यांच्या पक्षाला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर बनलेल्या नवीन सरकारने नजीब आणि त्यांच्या कुटुंबीयांना देश सोडून जाण्यास मनाई केलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)