मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धा : सायनाची विजयी सलामी, समीरचे आव्हान संपुष्टात 

कुआलालंपूर – भारताची अनुभवी महिला बॅडमिंटनपटू सायना नेहवालने आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सरळ गेममध्ये मात करताना येथे सुरू झालेल्या मलेशियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीत विजयी सलामी दिली. मात्र भारताचा अव्वल पुरुष खेळाडू समीर वर्माचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. या स्पर्धेत बिगरमानांकित असलेल्या सायनाने पहिल्या फेरीच्या लढतीत हॉंगकॉंगच्या बिगरमानांकित यिप पुई यिन हिच्यावर 21-12, 21-16 अशी सहज मात करताना आगेकूच केली. लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या सायनाला हा सामना जिंकण्यासाठी केवळ 42 मिनिटे लागली. सायनासमोर दुसऱ्या फेरीत द्वितीय मानांकित आकाने यामागुचीचे कडवे आव्हान आहे.

यामागुचीने पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या दिनार दियाह आयुस्टिनची कडवी झुंज 17-21, 21-12, 21-13 अशी 46 मिनिटांच्या झुंजीनंतर संपुष्टात आणताना विजयी सलामी दिली. महिला एकेरीतील अन्य लढतीत चतुर्थ मानांकित रत्चानोक इन्तेनॉनने डेन्मार्कच्या मा ब्लिचफेल्डचा 21-19, 21-12 असा 43 मिनिटांच्या लढतीनंतर पराभव करीत दुसरी फेरी गाठली. दरम्यान भारताच्या समीर वर्माला इंडोनेशियाचा माजी जगज्जेता टॉमी सुगिआर्तोविरुद्ध सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. सुगिआर्तोने समीरला कोणतीही संधी न देता केवळ 32 मिनिटांत 21-13, 21-5 अशा विजयासह दुसरी फेरी गाठली. तसेच मलेशियाच्या सातव्या मानांकित ली चोंग वेईने जपानच्या काझुमासा साकाईवर 21ृ13, 21-10 असा 33 मिनिटांत विजय मिळवितानवा दुसऱ्या फेरीत धडक मारली. रोहन कपूर व कुहू गर्ग या भारतीय जोडीलाही मिश्र दुहेरीतील पहिल्याच फेरीत हे जिटिंग व हे युए या चीनच्या आठव्या मानांकित जोडीविरुद्ध 9-21, 10-21 असा केवळ 27 मिनिटांत पराभव पत्करावा लागला. मिश्र दुहेरीतील आणखी एका लढतीत प्रणव जेरी चोप्रा आणि एन. सिक्‍की रेड्डी या भारतीय जोडीसमोर पहिल्या फेरीत झेग सिवेई व हुआंग याक्‍वियांग या चतुर्थ मानांकित चिनी जोडीचे आव्हान आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)