मला स्टार किड म्हणू नका – सारा अली खान

साराच्या पदार्पणाचा “केदारनाथ’ रिलीज होतो आहे. या सिनेमापूर्वीपासूनच तिची ओळख सैफची मुलगी अशी निर्माण झाली आहे. पण साराला अशी ओळख रुढ व्हायला नको आहे. स्वतःची वेगळी ओळख निर्माण व्हायला हवी, असा तिचा आग्रह आहे.

सिनेमात काम करायचे तिने निश्‍चित केलेले नव्हते. आपल्याला बघून एखादा फिल्ममेकर एखादा प्रस्ताव देईल, असे तिला वाटत होते. लहानपणापासून म्हणजे अगदी वयाच्या चौथ्या वर्षापासून अॅक्‍टर बनण्याचे स्वप्न होते. पण लहानपणी त्याबाबत फारसे गांभीर्य नव्हते. विदेशात शिक्षण पूर्ण करून भारतात परतल्यावर तिने त्याबाबत विचार करायला सुरुवात केली. त्याच दरम्यान “केदारनाथ’चा प्रस्ताव समोर आला आणि बॉलिवूड करिअरला सुरुवात झाली. फिल्मी फॅमिलीशी संबंधित असल्याने अॅक्‍टिंगबाबत तिच्यावर एकप्रकारचे दडपण होते. पण हे दडपण म्हणणे तिला जरा अवघड वाटते. अमृता सिंह आणि सैफची मुलगी, एक अॅक्‍टर अशी वेगळी ओळखच यामुळे नष्ट होते. पण आपल्या माता-पित्यांपासून दूर पळण्याचा प्रयत्न ती करते आहे, असा याचा अर्थ असा नाही. पण ही गोष्टही खरी आहे की बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी “केदारनाथ’च्या निमित्ताने जी संधी मिळाली आहे, ती अगदी सहज मिळाली आहे. आता आपोआपच आपल्या आईवडिलांच्या नावाला साजेसा परफॉर्मन्स करण्याची जबाबदारीही आपल्यावर येऊन पडली आहे, याचीही तिला जाणीव आहे.

“स्टार किड’ म्हणण्यापेक्षा एका गोष्टीवर साराने विशेष भर दिला. आपल्याला आई अमृता सिंहच्या नावाने ओळखले जायला हवे, अशी तिची अपेक्षा आहे. आपल्या आईकडून झालेल्या संस्कारांना ती अधिक महत्व देते. अभिनयाच्या बाबतीत वडील सैफ यांच्यापेक्षा आई अमृता सिंहची कारकिर्द अधिक परीणामकारक होती, हे तिच्या बोलण्यातून स्वाभाविकपणे लक्षात येते. अजून मोठा पल्ला गाठायचा आहे. त्यामुळे इतक्‍यातच स्वतःला काही सर्टिफिकेट देऊन टाकायला तिची तयारी नाही. “स्टार किड’ म्हटल्याने ही प्रगती थांबेल, अशी भीती तिला वाटते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)