मला सत्तेवर बसवलं की तुमची सत्ता टिकवली?

मनोहर पोटेंची बबनराव पाचपुतेंवर यांच्यावर टीका

श्रीगोंदा – गेली वीस वर्षे माजी मंत्री बबनराव पाचपुतेंशी आपण एकनिष्ठ राहिलो. पार्टीच्या एक रुपयालाही मी लाचार नाही. आपण नगरसेवक, नगराध्यक्ष फक्त जनतेच्या प्रेमावर झालो. दादा (बबनराव पाचपुते) तुम्ही मला सत्तेवर बसवलं की, तुमची पालिकेतील सत्ता मी टिकवली, याचे आत्मपरीक्षण करून आपल्यावर टीका करावी असा खोचक सल्ला नगराध्यक्ष मनोहर पोटे यांनी पाचपुतेंना दिला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

माजी मंत्री बबनराव पाचपुतेंनी पत्रकार परिषदेत मनोहर पोटेंवर घणाघाती टीका केली होती. त्यास प्रत्युत्तर म्हणून पत्रकारांशी बोलताना पोटे यांनी पाचपुतेवर टीका केली. पोटे पुढे म्हणाले, 2014 साली पाचपुतेंच्या नेतृत्वाखाली 10 जण निवडून आल्यास विरोधी गटाचे 9 जण निवडून आले. त्या निवडणूकीत आपण आपल्या प्रभागातील चारही उमेदवार विजयी केले, म्हणून पाचपुतेंची पालिकेत सत्ता टिकली. ज्यांची स्वतःची (सुनीता शिंदे) दोन मते होती, त्यांना आपण भरगोस मतांनी नगरसेवक केले. ज्यांना आपण घडवलं, नगरसेवक केलं त्या शिंदेंना हाताशी धरून, माझे राजकीय अस्तित्वात संपविण्याचे षडयंत्र भाजप नेत्यांनी केले. नेत्यांची मुलेच आपल्या विरोधात प्रचार करीत असल्याचे निदर्शनास आले. या षडयंत्राला कंटाळून आपणास पक्षत्याग करावा लागला.

पाचपुतेंबद्दल आपणास आदर आहे. सांगताना पोटे म्हणाले, गेली वीस वर्षे माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप कधीच झाले नाही. मात्र पक्ष सोडल्यानंतर माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत आहे. ते थांबले नाही तर, आगामी काळात पुराव्यानिशी आपण उत्तर देणार आहोत. नगरपरिषदेच्या कामांचे टेंडर आम्हा नगरसेवक व ठेकेदाराला काष्टीला बोलवून कशा प्रकारे निश्‍चित होत होती? हे आपणास सांगायची वेळ येऊ नये, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)