मला मुलांकडे लक्ष द्यायचे आहे- सुनिल शेट्टी

सुनिल शेट्टीची मुलगी आतियाने नुकतेच चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले आहे. तर त्याचा मुलगा आहनही लवकरच बॉलिवूडमध्ये पहिले पाऊल टाकणार आहे. या दोघांच्या करिअरकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचे आहे, असे सुनिल शेट्टीने सांगितले.

गेली 25 वर्षे सिनेमा करत असल्याने आता आपण मुलांच्या करिअरकडेच लक्ष देणार असल्याचे त्याने सांगितले. “मी जवळपास 126 सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यामुळे मी खूप सिनेमे केले नाहीत, असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी तर सिनेमांचा ओव्हरडोस केला आहे. आता मला ब्रेक घ्यायचा आहे. आता मला माझ्या मुलांकडे लक्ष द्यायचे आहे.’ असे तो म्हणाला.

आतिया शेट्टीचा सूरज पांचोलीबरोबरचा “हिरो’ आपटला होता. पण तरी आतियाचे पदार्पण दणक्‍यात झाल्याचे सुनिल मानतो. आता तिचा “मुबारकन’पण तयार होतो आहे. आहनदेखील साजिद नाडियादवालाच्या सिनेमातून पदार्पण करणार आहे. सुनिल शेट्टी गेल्या तीन वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. यानंतर “अ जंटलमन’मध्ये सिद्धार्थ मल्होत्राबरोबर तो दिसणार आहे. याशिवाय इतरही काही सिनेमांच्या ऑफर त्याच्याकडे आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)