मला मिळालेली देणगी !

आतापर्यंत बरं होतं, हे काय नवीनच सुरु झालय, हे खरंच त्रासदायक तर नाही नं? नेमकं काय आहे हे? असे सगळे प्रश्‍न नुकत्याच वयात आलेल्या मुलींना पडत असतात. तर हे जे काही आहे त्याच्याकडे अतिशय सकारात्मक नजरेने आपण पहिले तर सगळ सोप आणि सहज होईल. बघा ह मुलीनो, हे थोडं त्रासाच वाटलं तरी असं आजीबात नाहीये. तर आपल्याला मासिक पाळीच्या वेळी खूप शारीरिक त्रास होत असेल तर समजावं आपल्या आहारात काहीतरी कमतरता आहे.

मासिक पाळी आणि आपला आहार याचा खूप जवळचा संबंध आहे. कॅल्शियम, लोह, प्रथिने हे सर्व आपल्या आहारात रोजच्या रोज जाते का हे पाहिले पाहिजे. सर्व जीवनसत्व खनिजे आपल्याला रोजच्या आहारात मिळतात का हे देखील लक्षात घेतले पाहिजे. कारण आपला आभ्यास, आपले खेळणे व आपले बदल घडवत असणारे शरीर, आता या सगळ्यासाठी पोषण तत्व जास्त लागणार आहेत. शक्‍यतो बाहेरचे खाणे टाळावे. त्यातही तेलकट पदार्थ, मैदा असलेले पदार्थ टाळणे उत्तम. डबाबंद, पाकिटातील आयते पदार्थ खाणे नकोच. त्या ऐवजी जे आवडते ते घरी बनवून खाणे उत्तम.

आहारातून आपल्याला पोषण कशासाठी आवश्‍यक असते? तर मासिक पाळीसाठी गरजेची असणारी संप्रेरके व्यवस्थित प्रमाणात शरीरात निर्माण व्हावीत म्हणून. आणि हे जर व्यवस्थित असेल तर पुढे देखील मासिक पाळी निगडीत कोणत्या समस्या निर्माण होत नाहीत. पण याचं वयात जंक फूड खाणे जास्त वाढीला लागते व जेव्हा गरज असते तेव्हाच शरीराला योग्य आहार आणि पोषण मिळत नाही. त्याने मासिक पाळी नीट न येण्याचे प्रमाण वाढते. याचं वयात अजून एक गोष्ट आढळून येते ती म्हणजे स्थूलत्व.

मासिक पाळी सुरु झाल्यापासून हळूहळू वजन वाढू लागते आणि ते वाढत जाते. म्हणून या वयात व्यायाम व्यवस्थित करणे व आहार योग्य घेणे अतिशय गरजेचे आहे. या साठी माझ्यासारखे आहारतज्ञ आपल्या मदतीला आहेत. त्यांना एकदा भेट देऊन आपल्या वजन उंची नुसार काय व कसे खायचे होते व्यायाम करायचे हे जाणून घेऊन तसे करावे व निरोगी होऊन आयुष्याच्या नव्या पर्वाची सुंदर सुरुवात करावी.

श्रुती देशपांडे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)