मला कोणी सिरीयसली घेत नव्हते- प्रिती झिंटा

लग्न झाल्यापासून प्रिती झिंटा फिल्मी इंडस्ट्रीमधून अगदी गायब झाली होती. काही दिवसांपूर्वी नेस वाडियाविरोधातील विनयभंगाचे प्रकरण हायकोर्टात सुनावणीसाठी आले, तेंव्हा ती चर्चेत आली होती. तोपर्यंत ती भारतात आहे की अमेरिकेत हे देखील कोणाला माहिती नव्हते. आता सनी देओलबरोबरचा “भैय्याजी सुपरहिट’च्या निमित्ताने ती कमबॅक करते आहे. मात्र इतक्‍या वर्षात एकही सिनेमा न करण्यामागचे खरे खरे कारण तिने याच निमित्ताने सांगितले.

सिनेमात काम करता करता प्रितीला क्रिकेटमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला. तिने “आयपीएल’मध्ये 20 कोटी रुपये गुंतवले होते. एकावेळी सिनेमा आणि क्रिकेट या दोन्ही गोष्टी सहजपणे हाताळता येऊ शकणार नाही, हे तिच्या लक्षात आले. तेंव्हा सिनेमे नाकारायला सुरुवात केली. पण त्या उत्तरावर कोणी निर्माते विश्‍वासच ठेवायला तयार नव्हते. लग्न झाल्यावर तर विश्‍वास ठेवणे क्रमप्राप्त होते. पण तोपर्यंत सगळे निर्माते बिजनेसच्या बाबतीत सिरीयसली घेतच नव्हते. सगळ्यांना असे वाटायचे की सुंदर हिरोईनना अक्कलच नसते. त्याचप्रमाणे प्रितीही आपली मार्केट व्हॅल्यू वाढवण्यासाठी सिनेमे नाकारत असेल, असेच सगळे निर्माते समजत होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुष प्रधान कार्यसंस्कृती रुजली आहे. हिरोसारखे यश मिळवण्यासाठी हिरोईनला दसपट जास्त कष्ट घ्यावे लागतात. प्रश्‍न विचारणाऱ्या हिरोईन निर्मात्यांना- दिग्दर्शकांना नको असतात. मात्र मला तर प्रत्येक गोष्ट माहिती होणे आवश्‍यकच वाटते. त्याशिवाय माझे समाधान होणार नव्हते. हेच खरे कारण आहे. एक अॅक्‍ट्रेस म्हणून मला काहीही सिद्ध करायचे नव्हते. कोणत्याही हिरोईनबरोबर क्रमांक एकच्या पोझिशनसाठी स्पर्धाही करायची नव्हती. एवढेच नव्हे तर आता ज्याप्रमाणे “मी टू’अभियान ज्यासाठी छेडले गेले आहे, तसा छेडाछेडीचा प्रयत्नही कोणीही निर्माता, दिग्दर्शक किंवा अन्य अॅक्‍टरने केलेला नव्हता. मला सिनेमा करायचा नव्हता,. त्यात अन्य कोणतीही सबब शोधण्याची गरज नव्हती, असे प्रितीने स्पष्ट केले. मात्र आता पुन्हा सिनेमात काम करायची तिची इच्छा आहे. म्हणून तर “भैय्याजी सुपरहिट’मधून कमबॅक केले आहे तिने.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)