मलावीला भारताची 215 दशलक्ष डॉलर्सची मदत

लिलोंग्वे: भारताने मलावी देशाला त्यांच्या 18 पाणी प्रकल्पांसाठी एकूण 215 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचे मान्य केले आहे. भारताचे उपराष्ट्रपती त्या देशाच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी ही मदत त्यांना जाहीर केली आहे. या खेरीज दोन्ही देशांमध्ये तीन महत्वाचे करारही करण्यात आले आहेत. त्यात गुन्हेगार हस्तांतरण आणि अणु उर्जा प्रकल्पांचाही समावेश आहे.

यावेळी उपरराष्ट्रपतींनी त्या देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय सहकार्यावर चर्चा केली. त्यांनी भारतातर्फे मलावीच्या संरक्षण दलातील अधिकाऱ्यांना विशेष दर्जाचे प्रशिक्षण देण्याची मागणीही मान्य केली आहे. भारताने मलावीत महात्मा गांधी कन्व्हेंशन सेंटर उभारण्याचीही तयारी दर्शवली आहे. तेथील काही रूग्णालयांना भारतातर्फे कर्करोग उपचार यंत्रेही भेट दिली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)