मलायका आणि अर्जुन कपूरमध्ये अफेअरची पोलखोल 

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरमध्ये सध्या अफेअर रंगायला लागल्याचे बोलले जाते आहे. त्यांच्या या रिलेशनवर बोनी कपूर आणि सलमान यांनी आक्षेप घेतला आहे. मात्र तरिही या दोघांनी आपले प्रेमप्रकरण थांबवण्याचा जराही प्रयत्न केलेला नाही. पण आपण कोठेही एकांतात भेटल्याचे कोणाला दिसणार नाही, याची काळजीही ते घेत असतात. एकत्र दिसत नसल्यामुळे त्यांच्यात ब्रेक अप झाला की काय याची चर्चाही व्हायला लागली होती. आपले रिलेशन लपवण्याचा या दोघांनी जरी आटोकाट प्रयत्न केला असला तरी त्यांची पोलखोल झालीच.

हे दोघे अजूनही लपून छपून भेटत असतात, हे आता पुन्हा एकदा सर्वांसमोर आले आहे. दोघांनी इन्स्टाग्रामवर एकमेकांच्या फोटोंना लाईक केले आहे. त्यामुळे त्यांच्यातले रिलेशन संपलेले नाही, हे स्पष्ट झाले आहे.
अर्जुनने मलायकापासून दूर रहावे यासाठी त्याचे पप्पा बोनी कपूर यांनी आटापिटा केला होता. विशेषतः अरबाझ खान आणि मलायका विभक्‍त झाले तेंव्हापासूनच हे प्रेमप्रकरण सुरू होते. अरबाझ आणि मलायकामध्ये घटस्फोट होण्यासाठी अर्जुन कपूरच कारणीभूत होता, असेही बोलले जात होते. अर्जुन कपूर मलायकापेक्षा वयाने खूपच लहान आहे. त्यामुळे आणि अरबाझच्या माजी पत्नीबरोबरचे अफेअरची वार्ता इंडस्ट्रीमध्ये पसरल्यास अर्जुन कपूरच्या करिअरच्यादृष्टीने ते घातक होईल, अशी भीती बोनी कपूरना वाटत होती. काही अंशी त्यामध्ये तथ्यही आहे. याशिवाय सलमाननेही अर्जुनला समजावण्याचा प्रयत्न केल्याचे समजते आहे. अर्जुनने वरवर आपण विचार बदलल्याचे दाखवले. पण प्रत्यक्ष्यात बोनी कपूर आणि सलमानबरोबर नाराजी स्वीकारून त्याने आपले कारनामे सुरुच ठेवले होते.

ही चर्चा थांबवण्यासाठी एकदा मलायकानेच अर्जुन आपला खूप चांगला मित्र असल्याचे म्हटले होते. पण या स्पष्टिकरणामुळे त्यांच्यातील अफेअरची चर्चा थांबण्याऐवजी अधिकच वाढली होती. अर्जुन फुटबॉल शौकिन आहे. सध्या सुरू असलेल्या फुटबॉल विश्‍वचषक स्पर्धेमध्ये तो काही सामने बघायला गेला होता. तिथे त्याने रोनाल्डोबरोबर फोटोही काढले. त्या फोटोंनाही मलायकाने लाईक केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)