मलायका-अर्जुनने दिली प्रेमाची कबुली 

बॉलीवूडमध्ये रणवीर सिंह-दीपिका पादुकोण आणि प्रियांका चोप्रा-निक जोन्स यांच्या लग्नाची चर्चा सुरू आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांची रिलेशनशिपही प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. ही जोडी गेल्या अनेक दिवसांपासून मीडियापासून लपत होती. पण गुरूवारी उशिरापर्यंत चालणाऱ्या पार्टीतील दोघांची जवळीक आणि त्याचे फोटो सध्या चर्चेत आहेत. त्यावरून त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली आहे.

आता मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्यातील नाते जगजाहीर होताना दिसत आहे. सगळ्या मित्रपरिवारात यांच्यातील जवळीक अधिक खुलून दिसत आहे. हे नाते आता काही लपलेले नाही. मलायकाच्या वाढदिवशी हे कपल या अगोदर विमानतळावर एकत्र दिसले होते. पण मीडियाला बघताच त्यांनी आपला मार्ग बदलला होता. तर या दोघांनी एका चॅनलच्या रिऍलिटी शोमध्ये अगदी रोमॅंटिक अंदाजात डान्स केला आहे. पण पब्लिकली आपले नाते जाहिर करण्याची नवी संधी आहे. या अगोदर दोघेही आपले नाते लपवताना दिसत होते.

या फोटोत मलायकाचे जवळचे मित्र आहेत. यामध्ये करिना कपूर, लहान बहिण अमृता अरोरा, सुझैन खान यासोबत आणखी एक खास चेहरा यामध्ये आहे. यामध्ये मलायकाची आधीची जाव म्हणजे सुहेल खानची पत्नी सीमा खान देखील होती.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)