मलायका अरोरा अखेर कपूर कुटुंबात दाखल

मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर पुन्हा एकदा आपल्या नात्यामुळे चर्चेत आहेत. दोन दिवसांपूर्वीच या दोघांचे एकत्र न्यू ईअर सेलिब्रेशन करतानाचे फोटो समोर आले आहे. हे फोटो आहेत अर्जुन कपूरचे चाचू म्हणजे काका अभिनेता संजय कपूर यांनी दिलेल्या पार्टीतील. ही पार्टी त्यांच्या घरी देण्यात आली होती. यावेळी अर्जुन, मलायका एकमेकांचा हात पकडून संजय कपूर यांच्या घरी जाताना दिसत आहेत. या फोटोतून स्पष्ट होतंय की मलायका आणि अर्जुन यांच्या नात्याला संजय कपूर यांनी परवानगी दिली आहे. या पार्टीत करण जोहर देखील आहे. करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये अर्जुनने मान्य केले होते की, तो रिलेशनशिपमध्ये आहे. पण त्याने कुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे हे मात्र सांगण टाळले होते. संजय कपूरच्या अगोदर अनिल कपूरने देखील मलायका-अर्जुनच्या नात्यावर मोहर लावली होती. त्यांनी म्हटले होते की, अर्जुन खूष असेल तर आम्हाला काय त्रास आहे?

View this post on Instagram

Family ❤️

A post shared by Sanjay Kapoor (@sanjaykapoor2500) on

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही महिन्यांपूर्वी अर्जुन कपूरचे पप्पा बोनी कपूरनी अर्जुनला या रिलेशनशीप बाबत समजावले होते. दुसरीकडे मलायकाने आपल्या आडनावातून खान सपशेल हटवल्याची घोषणाही केली होती. अरबाझ खानबरोबरचा विवाह संपुष्टात आणल्यानंतर अर्जुन कपूर आणि मलायकाने काही महिने शांत राहण्याचे धोरण स्वीकारले होते. आता या दोघांच्याही रिलेशनशीपला कोणताही अडथळा उरलेला नाही, हे स्पष्ट झाल्यावर मात्र दोघांनी बिनधास्त राहण्याचे ठरवले आहे. अर्जुन आणि मलायका यांनी मुंबईत एक घर देखील खरेदी केले आहे. लवकरच हे दोघ आता लग्न करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)