मलाईका-अर्जुन कपूर लवकरच विवाहबंधनात अडकणार 

मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर या दोघांचाही मिलान एअरपोर्टवरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यानंतर आता हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकण्याची शक्‍यताही वर्तवण्यात येत आहे. या दोघांनीही रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली आत्तापर्यंत दिलेली नाही. पण या दोघांच्या विवाहाची घोषणा लवकरच होऊ शकते. हे दोघे गेल्या काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. पण मलाइकाने आम्ही चांगले मित्र असल्याचे म्हणत हा विषय कायमच टाळला आहे.
दरम्यान, पुढील वर्षी मलाईका अरोरा आणि अर्जुन कपूर हे दोघेही विवाहबंधनात अडकणार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. यासंदर्भातले वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले असून नुकतेच हे दोघेही अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या शोमध्ये गेले होते. तिथे त्यांचा एकमेकांबद्दलचा अंदाज, एकमेकांबद्दलची केमिस्ट्री खूप काही सांगून गेली.
या शोमध्ये ते एकमेकांबद्दल बोलत नव्हते. मात्र ते एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत होते. आता आपले हेच नाते पुढे घेऊन जाण्यासाठी या दोघांनी विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता या दोघांच्या विवाहाची तारीख ठरली आणि त्यांचे शुभमंगल लागले तर आश्‍चर्य वाटायला नको.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)