मलठण केंद्रात बालसभांचे आयोजन

राजर्षी शाहु महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम उत्साहात

अण्णापूर- आरक्षण देणारा पहिला राजा, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना
1 रु, दंड ठोकणारा राजा, कला संस्कृती, क्रीडा, शिक्षण यांना राजाश्रय देणारा राजा, अंधश्रद्धा, कर्मकांडे, दैववाद यावर प्रहार करणारा राजा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उचशिक्षणासाठी अर्थसाहय्य करणारा राजा, सर्व क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवणारा राजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी मलठण केंद्रातील सर्व शाळांमध्ये बालसभा तसेच विविध कार्यक्रमाद्वारे या जाणत्या राजाला अभिवादन करण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अण्णापूर येथील प्राथमिक शाळेत शाहु महाराजांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक भाऊसाहेब गवळी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर या शाळेतील पदवीधर शिक्षक शिवाजीराव वाळके यांनी शाहु महाराजांची महती सांगितली. निमगाव दुडे येथील प्राथमिक शाळेतही विद्यार्थी व शिक्षक यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. निमगाव भोगी शाळेत मुख्याध्यापक फक्कड थोरात यांनी शाहु महाराजांचे सामाजिक योगदान याविषयी माहिती सांगितली. आमदाबाद येथे मुख्याध्यापक जनार्दन फलके, सुनिता जगताप, मनोज गांधी, नामदेवा गायकवाड आणि आबा पवार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसह प्रतिमेचे पूजन केले. मुजावरवस्ती शाळेत आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी एकांकीका सादर केली. लाखेवाडी शाळेत मुख्याध्यापक रामदास पवार आणि दत्तात्रय जगताप यांनी विद्यार्थ्यांना शाहु महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगांची माहिती दिली. शिंदेवाडी, येवलेमाथा, जाधव न-हेवस्ती, पोटेवस्ती ,रावडेवाडी, मुजावरवस्ती, माशेरे मळा, कोठावळे वस्ती, पत्राकुरंदळे वस्ती, चाणखणबाबा वस्ती, कुरंदळे धनगरवस्ती याही शाळांमधून बालसभांचे आयोजन करण्यात आले.

दरम्यान मलठण शाळेत केंद्रप्रमुख रामदास बोरुडे व मुख्याध्यापक पाटीलबुवा मिडगुले, सुभाष जाधव यांनी उपस्थित सर्वांना मार्गदर्शन करीत शाहु महाराज जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.कारेगाव केंद्रातील उपक्रमशील अशा ढोकसांगवी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक संगीता पळसकर आणि सर्व , शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बालसभेचे नियोजन केले. बालसभेचे अध्यक्ष म्हणून सातवीतील विद्यार्थी मयुर जगताप याची निवड करण्यात आली, बालसभेचे प्रास्तविक प्रिया ढवळे हिने, तर सुत्रसंचालन अपेक्षा गोगडे या विद्यार्थिनीने केले. यावेळी पदवीधर शिक्षक दत्तात्रय गडदरे यांनी शाहु महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंगाची माहिती दिली.याचवेळी आकांक्षा कोळपे, ऐश्वर्या मिसाळ, पायल देवकाते, ऋत्विक मलगुंडे, मयुर जगताप या विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातुन शाहु महाराजांच्या स्मृती जागविल्या. शेवटी इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी प्रांजल मलगुंडे हिने सर्वांचे आभार मानले . यावेळी अनेक पालकही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)