मलजी बुवा महाराज कावडीचे वडापुरीत स्वागत

रेडा – वडापुरी (ता. इंदापूर) येथे शिखर-शिंगणापूरवरून जेउरवाडी येथे पायी जाणाऱ्या मलजी बुवा महाराज या मानाच्या कावडीचे गावात वाजतगाजत स्वागत करण्यात आले. या कावडीचा मान वडापुरी येथील पाटील घराण्याचा आहे. यावेळी हरिदास पाटील, राजेंद्र पाटील, सत्यवान पाटील यांनी कावडीला खांदा देवून मान घेतला. या कावडीचे वैशिष्ट्य म्हणजे सन 1340 च्या आधी पासून या कावडीची प्रथा सुरू आहे. 1340 रोजी मलजी बुवा महाराज यांनी शिंगणापूर येथे जाताना स्वता: जवळील असलेले चिपळ्या, पादूका, काठी, पाठ आदी वस्तू पाटील यांच्या घरी ठेवल्या व नातेपुते येथे जावून जिवंत समाधी घेतली असल्याची आख्यायिका आहे, त्यामुळे या कावडीला मानाची कावड म्हणून ओळखले जाते. शुक्रवारी (दि. 30) वडापुरी येथे कावडीचे आगमन झाल्यानंतर आरती करून कावडीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. यावेळी गावातील सर्व जाती धर्मातील ग्रामस्थ उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)