मलकापूर भाजपला जागा दाखवतील : मनोहर शिंदे

कराड – मलकापूर म्हणजेच विकास मोहिमेची मोहर आहे. याठिकाणी साकारण्यात आलेल्या नाविण्यपुर्ण संकल्पना साकारणाऱ्या शहराच्या विकासासाठी राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासकामे मार्गी लागलेली आहेत. मात्र निवडणुकीत भाजपाकडून केवल मतदारांची दिशाभूल करण्याचा उद्योग सुरु असून यांचेकडे विकासाचा कसलाही मुद्दा नाही. या निवडणुकीत मलकापूरचे सुज्ञ मतदार भाजपाच्या उमेदवारांना व त्यांच्या नेत्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असा विश्‍वास मलकापूरचे नेते मनोहर शिंदे यांनी व्यक्त केला.

आगाशिवनगर येथे प्रभाग क्र. 7 मधील राष्ट्रीय कॉंग्रेसच्या उमेदवारांचे प्रचारार्थ आयोजीत सभेत ते बोलत होते. यावेळी ऍड. उदयसिंह पाटील, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार निलम येडगे, दत्ता पवार, स्वाती तुपे, नंदु साठे, दीपक पाटणकर, रघु लाखे, राजू भोसले, गुणवंत भोसले यांची उपस्थिती होती. शिंदे म्हणाले, मलकापूर नगरपंचायतीने वेगाने प्रगती साधून देशातच नव्हे तर जगभरात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

24 बाय 7 पाणी पुरवठा योजनेमुळे नागरीकांचे राहणीमान उंचावले असून पंतप्रधान पुरस्कार, नॅशनल अर्बन वॉटर अवार्ड पुरस्कार आणि वीज बचतीसाठीचा मेढा अवार्ड पटकवणाऱ्या मलकापूर शहर परिसराचा चेहरामोहरा दिवसेंदिवस बदलू लागला असून घराघरात दररोज 24 तास मुबलक पाणी देणारे मलकापूर हे देशातील पहिले शहर ठरल्याने अतिविकसीत महानगरातील नागरीकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यापुढील काळातही मलकापूरचा केवळ विकासच करण्यासाठी कॉंग्रेसच्याच उमेदवारांना पाठबळ देवून त्यांना भरघोस मतांनी निवडून देण्यासाठी प्रयत्नांची पराकष्ठा करावी. असेही आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ऍड. उदयसिंह पाटील म्हणाले, मनोहर शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण बाबांच्या माध्यमातून मलकापूरला विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. त्यामुळेच देशपातळीवर मलकापूरचे नाव कॉंग्रेसच्या माध्यमातून झळकले आहे. मात्र विरोधक असणाऱ्या भाजपाच्या मंडळींनी याठिकाणच्या विकासकामांना खो घालण्याचे काम केले आहे. केवळ राजकारण करीत जनतेला मात्र विकासकामांबाबत झुलवत ठेवण्याचे काम केले आहे. या निवडणुकीत येथील मतदारच विरोधकांना त्यांची जागा दाखवतील.

यावेळी उमेदवार दत्ता पवार, स्वाती तुपे यांनी आपल्या भाषणात मलकापूरच्या विकासासाठी आम्ही कटीबध्द असून सूज्ञ मतदारांनी विरोधकांच्या दिशाभूलकडे लक्ष न देता कॉंग्रेसच्या विचारांचीच पाठराखण करावी. व कॉंग्रेसच्याच उमेदवारांना निवडून द्यावे, असेही आवाहन केले. प्रास्तावीक दत्ता पवार यांनी केले. आभार गुणवंत भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)