मलकापूर निवडणूक छाननीत 56 अर्ज अपात्र

17 जानेवारीला अंतिम यादी; 61 उमेदवार निवडणूक रिंगणात

कराड  – मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी व नगराध्यक्ष पदासाठी 15 पैकी 4 उमेदवार तर 119 उमेदवारांपैकी 61 उमेदवारांचे 66 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 53 अर्ज प्रशासकीय दृष्ट्या अपात्र ठरल्यामुळे 61 उमेदवार निवडणूक रिंगणात राहिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नगरपालिकेच्या बहुउद्देशीय इमारतीत गुरुवारी सकाळी 11 वाजता उमेदवारी अर्जाच्या छाननीस सुरवात झाली. नगराध्यक्ष पदासाठी 15 व नगरसेवक पदासाठी 119 अर्जाची गुरुवारी छाननी करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत गुरुवार, दि. 17 पर्यंत असून अंतिम यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

छानणीत प्रभाग 1 मधून गितांजली पाटील, मनिषा शिंदे, नारायण काशिद, प्रशांत चांदे, जमीर शेख, प्रभाग 2 मधून नाजिया मुल्ला, नुरजहॉं मुल्ला, विक्रम चव्हाण, सुनिल जाधव, सुर्यकांत मानकर, राजु मुल्ला, मोहन शिंगाडे, प्रभाग 3 मधून किशोर येडगे, मनोज येडगे, शिल्पा पाटोळे, आनंदी शिंदे, उमा शिंदे, प्रभाग 4 मधून अवंती घाडगे, भारती पाटील, संगीता शिंगण, अमर इंगवले, सुहास कदम, राजेंद्र यादव, दादा शिंगण, मधूकर शेलार, प्रभाग 5 मधून मनिषा चव्हाण, पद्माकर जाधव, मुकूंद माने, कल्पेश सोनवणे, भास्कर सोळवंडे, कमल कुराडे, सुशिला बागल, शोभा यादव, ज्ञानेश्वरी शिंदे. प्रभाग 6 मधून पुजा चव्हाण, दिनेश नार्वेकर, सद्दाम मुल्ला, नुरमहंमद शेख, पुनम जाधव, शकुंतला शिंगण, प्रभाग 7 मधून स्वाती तुपे, प्रज्ञा दरागडे, सविनय कांबळे, हणमंत जाधव, सागर निकम, दत्ता पवार, प्रभाग 8 मधून निर्मला काशिद, रुपाली माळी, सुनिता माळी, सुर्यकांत खोत, अजित थोरात, विलास पवार, सत्यवान पाटील, योगेश शिंदे, प्रभाग 9 मधून नंदा भोसले, अश्विनी हिंगसे, स्वाती पवार, रंजना पाटणकर, सुनील कोळी, मनोहर शिंदे, शामराव शिंदे यांचे वैध ठरले. नगराध्यक्षपदासाठी सारिका गावडे, रजनी माने, सविता येडगे, अश्विनी शिंगाडे यांचे अर्ज वैध ठरले. निवडणूक अधिकाऱ्यांनी इतर अर्ज प्रशासकीय दृष्ट्या अपात्र ठरल्याचे स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)