मलकापूर निवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी दोन अर्ज दाखल

मसूर – मलकापूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी केवळ दोनच अर्ज दाखल झाले असून हळूहळू या निवडणुकीत रंग भरु लागला आहे. बुधवारपासून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस प्रत्यक्षात प्रारंभ झाला असला तरी सुरुवातीच्या दोन दिवसात एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे थंडा प्रतिसाद दिसून आला. मात्र अर्ज दाखल करण्याच्या तिसऱ्यादिवशी प्रभाग क्रमांक 7 मधून माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे तर प्रभाग क्रमांक 8 मधून सूर्यकांत खोत यांनी आपला उमेदवारी अर्ज ऑनलाईन पध्दतीने दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत हळूहळू रंग भरु लागला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

मात्र अद्यापही कोणत्याच राजकिय पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. पहिल्या दिवशी 40 तर दुसऱ्या दिवशी 16 अशा एकूण 56 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे समजते. रविवार दि. 27 जानेवारी होणाऱ्या मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत बुधवार दि. 9 जानेवारी पर्यत असल्याने राजकीय पक्षांचे अर्ज दाखल होतील.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)