मलकापूर निवडणुकीत भाजपला 14 जागा मिळतील:चंद्रकांत पाटील

कराड, दि. 11 (प्रतिनिधी) – मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपला एकूण 14 जागा मिळतील, असा दावा राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दौऱ्यावेळी केला. दरम्यान कराड नगरपालिकेमधील भाजपच्या नगरसेवकांमधील धुसफूशीबाबत छेडले असता हा कौटुंबिक वाद असून लवकरच तो तडजोडीने मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
ना. चंद्रकांतदादा पाटील कराड दौऱ्यावेळी कराडसह मलकापुरात भेटीगाठी केल्या. तर शासकीय विश्रामगृहात प्रमुख पदाधिकाऱ्यांना कानगोष्टी सांगीतल्या. यावेळी पत्रकारांशी बोलताना मंत्री पाटील यांनी मलकापूरात विजयी होण्याचा दावा केला आहे. कोणतीही निवडणूक आम्ही जिंकण्याच्या उद्देशानेच लढतो. मलकापूर नगरपालिका निवडणूकीत भाजपा 14 जागा जिंकेल यासाठी प्रयत्न करत आहोत. कराडमधील भाजप नगरसेवकांमध्ये गैरसमजातून वाद धुमसत आहे. हा वाद कौटुंबिक स्वरुपाचा आहे. यावर सर्वाना एकत्र घेवून यावर तोडगा काढण्यात येणार असल्याचेही ना. पाटील यांनी यावेळी सांगीतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)