मलकापूर ते नांदलापूर रस्त्यासाठी 4.50 कोटींचा निधी

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या शिफारशीने निधीची तरतूद

कराड – मलकापूर नगरपंचायत कार्यक्षेत्रामधून कराड मार्केटयार्ड-मलकापूर-कोकरुड राज्य मार्ग क्र. 144 जात असून यामधील टप्पा क्रमांक 2 मलकापूर लक्ष्मीनगर मातंगवस्ती ते नांदलापूर रस्त्यासाठी राज्याच्या 2018-19 अर्थसंकल्पामध्ये आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांना दिलेल्या शिफारसपत्राद्वारे 4.50 कोटी निधीची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मनोहर शिंदे म्हणाले, शिफारस केल्याप्रमाणे टप्पा क्र. 1 व टप्पा क्र. 2 साठी 11.40 लक्ष रुपये निधी प्राप्त झाला आहे. तसेच टप्पा क्रमांक 1 कराड-मार्केटयार्ड ते मलकापूर रस्त्यासाठी अर्थसंकल्पामध्ये माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे शिफारशीनुसार 6.90 कोटी रुपये निधीची यापूर्वीच तरतूद करण्यात आली असून कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. याचे काम लवकरच सुरु होईल. या कामासाठी ना. चंद्रकांत (दादा) पाटील व ना. सुधीर मुनगंटीवार तसेच बांधकाम विभागाचे तत्कालिन प्रधान सचिव आशिष सिंग यांचे सहकार्य लाभले आहे.

मलकापूरची निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन काही मंडळी सदर रस्त्याच्या कामाबाबत लोकांची दिशाभूल करुन रस्त्याच्या कामामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करत आहेत. मलकापूरच्या विकासाच्या आड येणारी प्रवृत्ती कोण आहे हे जनतेला माहित आहे. मलकापूरचे नागरिकांना या सर्व बाबी ज्ञात आहेत. सदर रस्त्याचे दोन वर्षापासून दुतर्फा आर. सी. सी. गटरचे काम नागरिकांचे संमतीने सुरु असून ते बहुतांशी काम पूर्ण झाले आहे. सदर रस्त्याचे काम आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारशीमुळेच पुर्ण झाले आहे.

सदर रस्त्याचे काम पूर्ण झालेनंतर कराड शहरातून बाहेर पडण्यास व कराड शहरामध्ये येण्यास तसेच मलकापूर शहराच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग आहे. या मार्गावरुन मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वरील वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. सदरचा रस्ता हा महामार्गाला समांतर आहे. कराड शहर तासगाव-विटा या भागाकडे जाणारी येणारी वाहतूक या रस्त्याने होत असून शेती उत्पन्न बाजार समिती, भाजीपाला मार्केट, फळ मार्केट, बैल बाजार, सह्याद्री साखर कारखान्याकडे जाणारी वाहतूक सुध्दा या रस्त्याने होत आहे. यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्‍यक आहे. सदर रस्त्यामुळे मलकापूरच्या विकासाला चालना मिळणार आहे. अशीही माहिती कराड-दक्षिण कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)