मलकापूरात वसतिगृहाला आग

कराड, दि. 7 (प्रतिनिधी) –मलकापूर, ता. कराड येथे शुक्रवारी पहाटे आदिवासी मुलांच्या वसतिगृहाला अचानक लागलेल्या आगीत दोन दुचाकींसह सहा सायकली जळून खाक झाल्या. या घटनेत वसतिगृहातील 99 विद्यार्थी सुदैवाने बचावले, तर धावपळीत 3 विद्यार्थी जखमी झाले. अग्निशमन दलासह नागरिक व युवकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. शॉर्टसर्किटने आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
मलकापूर येथे मुख्य रस्त्यालगत आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. वसतिगृहात 116 विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यापैकी गुरूवारी 99 विद्यार्थी वसतिगृहात उपस्थित होते.
गुरुवारी रात्री 12 वाजता अभ्यास करून सर्वजण झोपी गेले. पहाटे पावणे तीन वाजता वसतिगृहाच्या तळमजल्यातील पार्किंग व वर्‍हांड्यात आग लागल्याचे काही विद्यार्थ्यांसह आसपासच्या युवकांच्या लक्षात आले. त्यांनी आरडाओरडा करून इतर विद्यार्थ्यांना जागे केले.
जिन्यात आणि वरांड्यात आग लागल्यामुळे पहिल्या व दुसर्‍या मजल्यावर असलेल्या मुलांनी मिळेल त्या मार्गाने मुख्य रस्त्यावर धूम ठोकली. यावेळी झालेल्या धावपळीत तीन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. प्रसंगावधान राखून अग्निशमन दलाला फोन करून पाचरण करण्यात आले.
परिसरातील नागरिक, युवक व अग्निशमन दलाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. मात्र, पार्किंगमध्ये लावलेल्या दोन दुचाकी, सहा सायकलींसह वर्‍हांड्यातील वायरिंग जळून खाक झाले होते. या आगीत लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. युवकांनी प्रसंगावधान राखत स्वयंपाकगृहातील गॅस सिलिंडर बाहेर काढल्यामुळे मोठा अनर्थ टळला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)