मलकापूरात फ्लॅट फोडून आठ तोळ्याचे दागिने लंपास

कराड, दि. 15 (प्रतिनिधी) – फ्लॅट फोडून चोरट्यांनी आठ तोळे दागिन्यांसह दोन लॅपटॉप लंपास केल्याची घटना मलकापूर (ता. कराड) येथील आनंद विहार अपार्टमेंटमध्ये गुरूवारी दुपारी घडली. तसेच चोरी केल्यानंतर चोरटे फ्लॅट मालकाचीच दुचाकी घेऊन पसार झाले. दरम्यान, चोरटे सीसीटीव्ही कैद झाले असून त्या फुटेजवरून पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गणेश ज्ञानेश्वर कुदळे हे कराड अर्बन बँके नोकरी करतात. गुरूवारी ते बँकेत गेले होते, तर त्यांच्या दुपारी घरातील साहित्य आणण्यासाठी त्या बझारमध्ये गेल्या होत्या. ही संधी साधून चोरट्यांनी आनंद विहार अपार्टमेंटमध्ये प्रवेश करून बनावट चावीने कुदळे यांच्या घराचा मुख्य दरवाजा उघडला. बेडरूममधील लाकडी कपाटाचे दरवाजे उघडून कपाटातील सुमारे आठ तोळे सोन्याचे दागिने आणि दोन लॅपटॉप लांबविले. चोरी केल्यानंतर चोरट्यांनी अपार्टमेंटच्या पार्किंगमधील फ्लॅट मालकाचीच दुचाकी घेऊन पलायन केले. लाल रंगाच्या पल्सर दुचाकीवरून चोरटे हातात काठी घेऊन आले होते. त्यांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाल्या आहेत. त्यावरून संशयितांचा शोध सुरू आहे. पोलीस उपअधिक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्नील लोखंडे यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासाची सुत्रे हलवली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)