मलकापूरात प्लास्टिक बंदी प्रबोधनासह कारवाई मोहीम

आयएसआय मार्क पिशव्या वापरासंबंधी परवानगीची गरज

कराड, दि. 28 (प्रतिनिधी) – पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या पर्यावरण रक्षण विभागाच्या आयुक्‍त आणि प्रशासकीय प्रमुखांच्या बैठकीत कारवाई करण्याअगोदर प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार मलकापूर नगरपंचायतीच्या वतीने अशिक्षित, सर्वसामान्य जनतेमध्ये प्रबोधन करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच जाणीवपूर्वक प्लास्टिकची विक्री, वापर, गैरवापर, खरेदी करणे वा साठा करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मोहीमही हाती घेण्यात आली आहे.
कारवाई कमिटीमध्ये आत्माराम मोहिते, मल्लिकार्जुन बनसोडे, बाजीराव जाधव, रामचंद्र शिंदे, प्रतापराव पवार, रमेश बगल, पुंडलिक ढगे, अमर तडाके आणि हेमंत पलंगे यांचा समावेश करण्यात आला आहे. कमिटीच्या माध्यमातून शहरातील नागरिकांमध्ये प्लास्टिक बंदीबाबत प्रबोधन करण्याचे काम सुरु केले असून मोहिमेंतर्गत प्लास्टिक पिशवी बाळगल्यास, वापरल्यास वा अवैधरीत्या साठा व विक्री केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. बंदीचे एकदा उल्लंघन केल्यास 5 हजार, दुसऱ्यांदा 10 हजार आणि त्यानंतर 25 हजार रुपये दंड आणि तीन महिन्याचा तुरुंगवास अशी कारवाई करण्यात येणार असल्याचे नागरिकांना सूचित करण्यात आले आहे.
नगरपंचायत प्रशासन, नगरसेवक, पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक महिन्यांपासून शहरात प्लास्टिक बंदी मोहीम काटेकोरपणे राबवल्याने प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यासाठी नगरपंचायत प्रशासनाला विशेष परिश्रम घ्यावे लागत नाहीत. शहरात पर्यावरण कमिटीच्या धडक कारवाई व स्वच्छता मोहिमेत बाजारपेठ, व्यापारी, दुकानदार यांच्याकडे कोणत्याही प्रकारची विक्री किंवा प्लास्टिक साठा आढळून आलेला नाही. परंतु, शासनाचा अध्यादेश यायच्या आधी नगरपंचायतीने कारवाईत 300 रुपयांपर्यंत दंड वसूल केला आहे. दरम्यान, दि. 28 रोजी नगरपंचायतीच्या स्वच्छता कमिटीने सुमारे 100 ते 150 दुकानांमध्ये पाहणी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडे कसलाही प्लास्टिकचा साठा, विक्री वा वापर करण्यात येत नसल्याचे दिसून आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)