मलकापूरात धूम स्टाईलने मंगळसूत्र लांबवले

कराड, दि. 5 (प्रतिनिधी)- शाळेतून आलेल्या मुलांना घरी घेऊन जात आसताना धूम स्टाईलने येऊन महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केल्याची घटना गुरूवारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास मलकापूर (ता. कराड) येथील कोयना वसाहतीनजीकच्या शिवदर्शन कॉलनी रस्त्यावर घडली. दरम्यान, धूम स्टाईल चोरट्यांचा पाठलाग करूनही चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, रूपाली प्रकाश कणसे (वय 31) या कोयना औद्योगिक वसाहतीजवळील शिवदर्शन कॉलनीत कुटुंबासह राहतात. रूपाली यांची मुले वाठार येथील कृष्णा इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिकत आहेत. तीन ते साडेतीन वाजण्याच्या सुमारास मुले शाळेच्या बसमधून कॉलनीसमोरील उपमार्गावर उतरतात. त्यांना घरी घेऊन जाण्यासाठी रूपाली दररोज 3 वाजण्याच्या सुमारास उपमार्गावर येतात. गुरूवारीही त्या मुलांना नेण्यासाठी आल्या होत्या. साडेतीन वाजता मुलांना घेऊन घरी जात असताना दुचाकीवरुन आलेल्या धूम स्टाईल चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील 40 हजार रूपये किंमतीचे दीड तोळ्याचे मंगळसूत्र हिसकावून कराडच्या दिशेने पोबारा केला. रूपाली कणसे यांनी आरडाओरडा करत प्रसंगावधान राखून चोरट्यांचा पाठलाग केला. मात्र, चोरटे पसार झाले.
आरडाओरडा झाल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची खबर मिळताच पोलिस अधिकार्‍यांसह कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. कणसे यांच्याकडून माहिती घेऊन तपासाची चक्रे फिरविली. या घटनेची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)