मलकापूरात दुसऱ्या दिवशीही अर्जास थंडा प्रतिसाद

कराड – मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी बुधवारपासून ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाली. अर्ज दाखल करण्याच्या सलग दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झालेला नाही. मात्र पहिल्या दिवशी 40 तर दुसऱ्या दिवशी 38 अशा एकूण 78 उमेदवारी अर्जांची विक्री झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मलकापूर नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक 27 जानेवारीला होत असून त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास मंगळवारी प्रारंभ झाला आहे.

बुधवार, दि. 9 जानेवारीपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 40 तर दुसऱ्या दिवशी 38 उमेदवारी अर्जाची विक्री झाली असून अद्यापही ऑनलाईन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास थंडा प्रतिसाद असल्याचे दिसून येत आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)