मलकापूरात जोरदार शक्तीप्रदर्शनाने अर्ज दाखल

नगराध्यक्ष पदासाठी दोन तर नगरसेवक, नगरसेविकांसाठी 42 अर्ज दाखल

कराड  – मलकापूर नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी ऑनलाईन नामनिर्देशित अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी मंगळवारी एकूण 44 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भाजप 29, राष्ट्रीय कॉंग्रेस 8, शिवसेना 3, अपक्ष 5 असे अर्ज दाखल करण्यात आले असून राष्ट्रीय कॉंग्रेसच्या इच्छुकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतीम टप्प्यात मंगळवारी राष्ट्रीय कॉंग्रेस, भाजपा, शिवसेना यांचेसह अपक्षांनीही अर्ज दाखल केल्याने या निवडणुकीची रंगत वाढू लागली आहे. प्रभाग 1 मधून तृप्ती पलंगे व गितांजली पाटील, प्रशांत चांदे (रा. कॉंग्रेस), शुभांगी शेवाळे, मनिषा शिंदे, विकास शेवाळे (भाजप), प्रभाग 2 मधून सुर्यकांत मानकर (शिवसेना), विक्रम चव्हाण, मनोज येडगे, हणमंत गावडे (भाजप), धनंजय येडगे (रा. कॉंग्रेस), प्रभाग 3 मधून कल्पना रैनाक (रा. कॉंग्रेस), उमा शिंदे (अपक्ष), नसीर इनामदार, प्रियांका यादव (भाजप), प्रभाग 4 मधून भारती पाटील, राजेंद्र यादव (रा. कॉंग्रेस), संगिता शिंगण, वैशाली यादव, दादा शिंगण, सुहास कदम, अरुण यादव (भाजप), दादा शिंगण, मधुकर शेलार (शिवसेना), संगिता शिंगण, दादा शिंगण (अपक्ष), प्रभाग 5 मधून बाळासो सातपुते, शोभा यादव, रेश्‍मा शेवाळे, संगिता शेवाळे, कांचन यादव (भाजप), ज्ञानेश्‍वरी शिंदे (रा. कॉंग्रेस), ज्ञानेश्‍वरी शिंदे (अपक्ष), प्रभाग 6 मधून राहुल भोसले, दिनेश नार्वेकर, अंजना रैनाक (भाजप), सद्दाम मुल्ला (अपक्ष), प्रभाग 7 मधून आकांक्षा झिमूर, हणमंतराव जाधव, प्रभाग 8 मधून अजित थोरात, विजय पवार, अभिजीत घाडगे (भाजप), अश्‍विनी हिंगसे, प्रभाग 9 मधून नगराध्यक्ष पदासाठी दीपा राहुल भोसले (भाजप) व अश्‍विनी संतोष हिंगसे (भाजप) असे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या सातव्या दिवशी 9 तर सात दिवसात एकूण 113 नामनिर्देशन पत्रांची विक्री झाली. आज संगणकीकृत नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी दुपारी 3 वाजेपर्यंत मुदत आहे. राष्ट्रीय कॉंगेस, भाजप, शिवसेना व अपक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असल्याने या निवडणुकीत चांगलीच रंगत आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)