मलकापूरात चोऱ्यांचे सत्र सुरुच

कराड – मलकापूर, ता. कराड येथे सलग दुसऱ्या दिवशी दुकानांची कुलपे कटावणीने तोडून चोरट्यांनी दोन दुकानात चोरीचा प्रयत्न केला. कराड-ढेबेवाडी मार्गालगत आगाशिवनगरात जिल्हा परिषद कॉलनीत बुधवारी मध्यरात्रीनंतर ही घटना घडली. रात्री फोडलेल्या दुकानातून एक कॅलक्‍यूलेटरसह रंगाचे व फेविकॉलचे डबे लंपास केले आहेत. चोरीच्या घटनांमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे.

याबाबत घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, कराड-ढेबेवाडी मार्गालगत आगाशिवनगर येथे असलेल्या झेडपी कॉलनीतील मंगळवारी हॉटेल भाग्यहीरासह परिसरातील चार दुकाने चोरट्यांनी फोडून रोख रकमेसह साहित्य अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. ही घटना ताजी असतानाच बुधवारी दुसऱ्याच दिवशी याच कॉलनीतील रंगसंकुल हे दुकान फोडून कॅलक्‍युलेटरसह रंगाचे व फेविकॉलचे काही डबे चोरट्यांनी लंपास केले आहेत. याच कॉलनीतील श्री सेल्स या दुकानाचे कुलूप तोडत असताना शटरच्या आवाजाने कॉलनीतील नागरिक जागे झाले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काही नागरिकांनी दुकानाकडे धाव घेतली. नागरिकांची चाहुल लागताच चोरटे पसार झाले. नेमके त्याचवेळी रात्रगस्तीवरील पोलीस त्याठिकाणी आले. नागरिकांनी चोरीबाबत पोलीसांना खबर दिली. पोलीसांनीही जादा कुमक मागवून आगाशिवनगरात कोंबींग ऑपरेशन राबविले. मात्र, अंधाराचा फायदा घेऊन चोरटे पळून जाण्यात यशस्वी ठरले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)