मलकापूरला कराडचीच पुनरावृत्ती होईल

कराड – मलकापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपच बाजी मारणार असून कराडची पुनरावृत्ती करीत मलकापूर नगरपालिकेतही भाजपचीच सत्ता येईल, असा ठाम विश्वास महसूलमंत्री ना. चंद्रकांत दादा पाटील यांनी व्यक्त केला.
मलकापूर नगरपरिषद निवडणूक प्रचार बैठकीत ना. पाटील बोलत होते. यावेळी ना. डॉ. अतुल भोसले, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सारिका गावडे, दादा शिंगण, अरुण यादव, विजय देशमुख आदी उपस्थित होते.

ना. पाटील म्हणाले, मलकापूर नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ना. डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले भाजपाचे सर्वच उमेदवार हे सुशिक्षित व अभ्यासू असे असल्यामुळे यांनाच निवडून देऊन मलकापूरच्या विकास साधावा.
ना. डॉ. अतुल भोसले म्हणाले, मलकापूर शहराच्या विकासासाठी सुज्ञ मतदारांनी भाजपाच्या उमेदवारांनाच निवडून द्यावे. कराडला भाजपाचा नगराध्यक्ष निवडून आल्याने याठिकाणी भाजपाच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत, असेही डॉ. भोसले यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)