मलकापूरला उद्या सरकारविरोधात धनगर समाजाची बैठक

कराड   भाजपा सरकारला सत्तेवर येवून चार वर्षे झाली तरी धनगर समाजाला आरक्षणापासून झुलवत ठेवले आहे. या सरकारला सळो की पळो करुन सोडण्यासाठी मोठ्या प्रमाणात उठाव करण्यासाठी रविवार, दि. 25 रोजी दुपारी 1 वाजता मलकापूर येथे बिरोबा मंदीर याठिकाणी महत्वपूर्ण सभेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती धनगर समाज आरक्षण कृती समितीने दिली आहे.

महाराष्ट्रातील धनगर समाजाला आरक्षण देतो, म्हणून समस्त धनगर समाजाची या युती सरकारने फसवणूक केली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत नमूद करुन धनगर समाजाला एसटी च्या सवलती देवू केलेल्या आहेत. बारामती येथे झालेल्या धनगर समाजाच्या महामेळाव्यात भाजपाच्या नेत्यांनी येत्या निवडणुकीत आमचे सरकार सत्तेवर आणा, आम्ही तुम्हाला पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये धनगर समाजाला एसटी च्या सवलती लागू करतो. असे जाहिरपणे सांगीतले होते. मात्र चार वर्षे झाली तरी याबाबत ठोस निर्णय घेतलेला नाही.

-Ads-

याविरोधात आवाज उठविण्यासाठी दि. 25 रोजी या सभेचे आयोजन करण्यात आले असून तालुक्‍यातील धनगर समाज बांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)