मलकापूरमधून कॉंग्रेसला हद्दपार करा

कराड – कॉंग्रेसच्या काळात रोज एक घोटाळा घडत होता. त्यामुळेच देशातील सुजाण जनतेने केंद्रातून व राज्यातून कॉंग्रेसला हद्दपार केले आहे. आता मलकापुरातूनही कॉंग्रेसला हद्दपार करा, असे आवाहन राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष ना. शेखर चरेगावकर यांनी केले.

मलकापूर येथे भारतीय जनता पार्टी व मित्रपक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी डॉ. सुरेश भोसले, धोंडिराम जाधव, अशोकराव थोरात, आबासो साळुंखे, राहुल पाटील, आबासो गावडे आदी उपस्थित होते.
ना. चरेगावकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली होत असलेला सामान्य जनतेचा विकास पाहून विरोधकांना पोटशूळ उठला आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार व नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे यांना विजयी करा. डॉ. भोसले म्हणाले, वाढीव 24 बाय 7 योजनेतून मागेल त्याला कमीत कमी खर्चात नळ कनेक्‍शन, झोपडपट्टी, कोल्हाटी, दांगट वस्तीत पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पक्की घरे उपलब्ध केली जाणार आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)