मलकापूरचा विकास विरोधकांना कसा दिसेल

मनोहर शिंदे यांचे प्रत्युत्तर
कराड, दि. 27 (प्रतिनिधी) – केंद्र शासनाने राबविलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षण 2018 च्या स्पर्धेमध्ये मलकापूर नगरपंचायतीने सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या निमित्ताने व त्याआधीही मलकापूर नगरपंचायतीने स्वच्छता व सुंदर शहर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. यापुढेही स्वच्छतेसह शहराच्या संपूर्ण विकासासाठी आपण प्रयत्नशील असून विकास एका दिवसात होत नसून ती न संपणारी गोष्ट असल्याचे मत मलकापूर नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी व्यक्त केले.
स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेच्या निकालावरून विरोधी पक्षनेते हणमंतराव जाधव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सत्ताधाऱ्यांवर केलेल्या आरोपाबाबत शिंदे यांना दैनिक प्रभातने छेडले असता ते बोलत होते. ते म्हणाले, मलकापूर शहराचा विस्तार गेल्या काही वर्षात झपाट्याने झाला. त्यामुळे नागरिकांसह विद्यार्थी, व्यावसायिक, व्यापारी, नोकरदार, महिलांसाठी नगरपंचायतीने कामगिरी केली आहे. मलकापूर महामार्गालगत असल्यामुळे शहरात प्रवाशांची ये-जा मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शहराला स्वच्छ ठेवण्याचे आवाहन होते. ते नगरपंचायतीने सर्वांच्या सहकार्यातून पार पाडल्याने मलकापूर शहर स्वच्छच आहे.
शासनाच्या स्वच्छ सर्व्हेक्षण स्पर्धेदरम्यान शहरात विविध उपक्रम राबवण्यात आले आहेत. नगरपंचायतीने शहराची संपूर्ण स्वच्छता, ओला कचरा, सुका कचरा वेगवेगळा गोळा करणे, सेंद्रिय खत निर्मिती करणे यासह अन्य विकासकामे केली आहेत. फक्त स्पर्धेपुरती स्वच्छता न करता त्यानंतरही स्वच्छतेत सातत्य ठेवण्यासाठी नगरपंचायत प्रयत्नशील असल्यामुळे सर्वेक्षणात मोठी आशा होती असेही मत त्यांनी व्यक्त केली.
शहराचा विकास झाला किंवा नाही म्हणणे फार सोपे आहे. मात्र प्रत्यक्षात तो करून दाखवणे ही गोष्ट फार महत्वाची असून यामध्ये सातत्य राखणेही महत्वाचे आहे. या स्पर्धेच्या गुणतालिकेत मलकापूर नगरपंचायत कोणत्या बाबीमध्ये कमी पडली त्याची माहिती घेणार असून त्याची पूर्तता करून इतर विकासकामांची भर घालून पुढील वर्षी नक्कीच दर्जेदार कामगिरी केलेली दिसून येईल. शिवाय तसेही आम्ही शहरात कितीही स्वच्छता केली, विकासकामे केली तरीही विरोधकांना ती कशी दिसतील, असे सांगून विरोधकांनी कुणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवून बोलू नये, असाही टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)