मलकापुरात पहिल्या दिवशी एकही अर्ज नाही

कराड – मलकापूर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया बुधवार, दि. 2 जानेवारीपासून सुरु झाली. मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी दाखल झाला नसल्याचे सहाय्यक निवडणुक अधिकारी संजीवनी दळवी यांनी सांगीतले. मलकापूर निवडणुकीसाठी राजकिय मंडळींनी मोर्चेबांधणी केलेली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. यासाठी प्रशासनाचे वतीने चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

ऑनलाईन पध्दतीने उमेदवारी अर्ज भरले जाणार असून पहिल्या दिवशी काही इच्छुकांनी ऑनलाईन प्रक्रिया समजून घेण्यासाठी अधिकाऱ्यांची भेट घेतली. याठिकाणी नगराध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी राखीव आहे. मलकापूर नगरपरिषदेसाठी प्रथमच थेट जनतेतून नगराध्यक्षपदाची निवड होणार असल्याने कराड तालुक्‍याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मलकापूर नगरपालिका निवडणुकीसाठी 2 ते 9 जानेवारी पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. रविवार, 6 जानेवारी रोजी सुट्टीच्या दिवशी अर्ज स्विकारले जाणार नाहीत. उमेदवारी अर्ज स्विकारण्याची वेळ सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. उमेदवारी अर्जांची छाननी 10 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता होईल. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी प्रसिद्ध होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत 17 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आहे. 27 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान आणि 28 जानेवारी सकाळी 10 वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)