मलकापुरात नैतिक विजय भाजपाचा : ना. डॉ. भोसले

कराड – -मलकापूर नगरपरिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भाजपाच्या द्वेषापोटी व स्वत:च्या स्वार्थासाठी एक माजी मुख्यमंत्री, एक माजी आमदार यांच्यासह तालुक्‍यातले अनेक पुढारी एकत्र आले. पण मलकापूरच्या जनतेने मात्र भाजपाच्या उमेदवारांना भरभरुन मतदान केले. निवडून आलेले सत्ताधारी आणि आपल्या मतांमध्ये केवळ 1.76 टक्‍क्‍याचाच फरक राहिला आहे. मलकापूरच्या जनतेने भाजपाच्या उमेदवारांना भरघोस साथ देऊन भाजपाचा नैतिक विजय साध्य केला असल्याचे प्रतिपादन ना. डॉ. अतुल भोसले यांनी केले.

मलकापूर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांचे आभार मानण्यासाठी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी शेतीमित्र अशोकराव थोरात, भाजपाचे तालुकाध्यक्ष हर्षवर्धन मोहिते, नूतन नगरसेवक दिनेश रैनाक, नूरजहॉं मुल्ला, भास्कर सोळवंडे, अजित थोरात, निर्मला काशीद, माजी नगराध्यक्ष आबा गावडे, कृष्णा कारखान्याचे संचालक धोंडिराम जाधव, कृष्णा बॅंकेचे संचालक महादेव पवार, पैलवान आनंदराव मोहिते आदी मान्यवर होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ना. भोसले म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विचाराने व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाने आपण या निवडणुकीत अटीतटीची लढत दिली. मात्र अनेक ठिकाणी आपल्या उमेदवारांना निसटता पराभव पत्करावा लागला. पण कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून न जाता, तो पचवून लगेच त्यावर मात करण्यासाठी आपले पक्षसंघटन अधिक मजबूत करावे. मलकापूरच्या नगरपरिषदेत भाजपाच्या कमळ चिन्हावर निवडून गेलेले 5 नगरसेवक नेहमी मलकापूरच्या विकासासाठी बांधिल राहतील.

अशोकराव थोरात म्हणाले, भाजपाच्या कार्यकर्त्यांनी येत्या काळात योग्य पक्षबांधणी करुन येणाऱ्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज रहावे. मलकापूरच्या निवडणुकीत जवळपास निम्म्या मतदारांनी भाजपाच्या पाठीशी राहत भक्कम पाठबळ दिले असून आपण सर्वांनी केलेल्या कामाचे हे फलित आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे.

यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. सारिका गावडे, नूतन नगरसेवक भास्कर सोळवंडे, अजित थोरात, सुहास कदम, चंद्रकांत देसाई, इसाक मुजावर यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मनोज येडगे, उमा प्रमोद शिंदे, अवंती घाडगे, शोभा यादव, अश्विनी संतोष हिंगसे, शामराव शिंदे यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)