मलई कोणाच्यातरी घशात घालण्याचा डाव

जाहिरात धोरणप्रकरणी विरोधी पक्षनेते बराटे यांची टीका

पुणे – “स्मार्ट सिटी कंपनीला महापालिकेचे जाहिरात धोरण ठरवण्याचा कोणताच अधिकार नसताना भाजप सदस्यांनी स्मार्ट सिटी कंपनीकडून आलेल्या जाहिरात धोरणाच्या पत्राच्या आधारे प्रस्ताव तयार करून स्थायी समितीमध्ये मांडला आणि मंजूर करून घेतला. विशेष असे, की त्याचदिवशी मुख्यसभेत विरोधकांनी आंदोलन केले असताना सभागृह नेत्यांनी गोंधळातच हा विषय पुकारून मतदानाद्वारे तो मंजूरही करून घेतला,’ असा दावा स्थायी समिती सदस्य आणि विरोधी पक्षनेते दिलीप बराटे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विरोधकांना त्यांची मते मांडायची संधीही दिली नाही. स्मार्ट सिटीने तयार केलेल्या धोरणानुसार पालिकेला 50 ते 60 कोटी रुपये उत्पन्न मिळणार आहे. तर महापालिकेच्या सुधारित धोरणामुळे 150 ते 175 कोटी रुपयांपर्यंत उत्पन्न मिळेल, असे स्वत: आयुक्त सांगत असताना सभागृहनेते भिमाले त्यावर विश्‍वास ठेवायला तयार नाहीत. महापालिकेचे आर्थिक नुकसान करून कोणाला तरी मलई खाता यावी, यासाठी त्यांचे प्रयत्न असल्याचे यातून दिसून येते. मागील दोन वर्षांत ते कधीही स्थायी समितीच्या बैठकीत आले नाहीत. परंतु “इंटरेस्ट’चा विषय असल्यानेच ते आज या विषयाच्यावेळी बैठकीत आले. त्यांनी आयुक्तांना एकेरी भाषा वापरत तुम्ही दादागिरी करता. आम्ही सत्तेत आहोत विसरू नका, असा दमही आयुक्तांना भरला, अशी माहिती बराटे यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)