मर्सेसन यांच्या मृत्यूचे गूढ…

लंडन – वायलपूर्वी “पर्सनल डाटा, आयओ’चे सहसंस्थापक डॅन मर्सेसन हे देखील भारतात कार्यरत होते. मात्र नंतर केनियामध्ये त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला. त्यांच्यावर विषप्रयोग झाल्याचा संशय असल्याचेही वायल यांनी सांगितले. वायल यांच्याबरोबर पॉल ओलिव्हर डेहाय या अन्य अधिकाऱ्याचीही संसदीय समितीपुढे साक्ष झाली आहे.

निवडणूकीत कॉंग्रेसचा पराभव व्हावा यासाठी मर्सेसन यांना भारतातील अब्जाधीशाकडून मोठा आर्थिक मोबदला दिला जात होता.

त्यामुळे मर्सेसन हे प्रत्यक्ष्यात एका पक्षाकडून पैसे घेत असत. पण काम दुसऱ्याच पक्षासाठी करत असत, असे डेहाय यांनी आपल्या साक्षीदरम्यान सांगितले. मर्सेसन यांच्या मृत्यूचे रहस्य उलगडण्यासाठी भारत आणि केनियातील पत्रकारांनीच तपास करायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)