मर्ढेत डॉल्बीवर पोलिसाची धडक कारवाई

सातारा – गणेशोत्सवाच्या एक दिवस आधीच पोलिसांनी “डॉल्बी’ला चांगला दणका दिला. मढे, ता. सातारा येथे लग्नाच्या वरातीसाठी डॉल्बी वाजत असल्याची माहिती सातारा तालुका पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ गावात जाऊन वरात बंद करुन डॉल्बी जप्त केली आहे.

शासनाने डॉल्बी बंदीचा आदेश दिलेला असताना मंगळवारी रात्री सातारा तालुक्‍यातील मर्ढे या गावात लग्नाच्या वरातीसाठी डॉल्बी लावण्यात आली होती. याबाबत पोलिसांना सूत्रांकडून माहिती मिळाली होती. माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे काही कर्मचारी आनेवाडी ते मर्ढे या मार्गे तर काही कर्मचारी गोवे ते मर्ढे या मार्गाने गावात घुसले. पोलिसांचे पथक पाहताच युवकांसह डॉल्बीचालकाचाही तारांबळ उडाली. दोन्ही बाजूने पोलीस आल्यामुळे डॉल्बी लपविताही आली नाही आणि पळूनही जाता आले नाही.

पोलिसांना पाहून भांबावलेल्या तरुणांसह लग्न समारंभ असलेल्या कुटुंबियांनी हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, यापूर्वीही गावात असाच प्रकार घडला होता. त्यावेळी पुन्हा असा प्रकार घडल्यास कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला होता. मात्र, त्यानंतरही पोलिसांचा इशारा न जुमानता गावात डॉल्बी वाजल्यामुळे संतापलेल्या पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत थेट डॉल्बी जप्त केली. पोलिसांच्या या कारवाईमुळे गणेशोत्सवातदेखील डॉल्बी वाजविताना मंडळांना विचार करावा लागणार आहे. पोलिसांच्या या आक्रमकपणामुळे गणेशमंडळांनी मात्र चांगलीच धास्ती घेतली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)