मरेपर्यंत शिक्षेसाठी विषारी इंजेक्शन देणे अमानवीय – केंद्र सरकार

नवी दिली : कोणत्याही आरोपीस मरेपर्यंत शिक्षा देण्यासाठी विषारी इंजेक्शनपेक्षा फाशी देणे कधीही योग्यच असल्याचे केंद्र सरकारने आज सर्वोच्च न्यायालयात म्हटले आहे. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर केंद्र सरकारने आपली बाजू स्पष्ट केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ वकील ऋषी मल्होत्रा यांच्याद्वारे न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत त्यांनी मरेपर्यंत शिक्षेसाठी फाशी शिवाय अन्य कोणत्या पर्यायाचा अवलंब केला जाऊ शकतो असे म्हटले होते. यासाठी त्यांनी गोळी झाडणे किंवा विषारी वायूद्वारे शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. फाशीची शिक्षा दिल्यानंतर आरोपीचा जीव जाण्यासाठी ४० मिनिटे लागतात. मात्र इतर पर्यायामध्ये काही मिनिटांत आरोपीचा जीव जातो त्यामुळे त्याला त्रास कमी होईल असेही त्यांनी म्हटले आहे. या पर्यायामध्ये मल्होत्रा यांनी विजेचा शॉक, विषारी इंजेक्शन,  त्यांच्या याच याचिकेवर आज केंद्र सरकारने आपली बाजू मांडली. यावेळी सरकारकडून कोणत्याही आरोपीस  विषारी इंजेक्शन देणे हे फाशी देण्यापेक्षा जास्त अमानवीय असल्याचे म्हटले. तसेच आपल्या देशात फाशीची शिक्षा ही अत्यंत कठोर गुन्हा करणाऱ्यांना देण्यात येते. त्यामुळे फाशीची शिक्षा ही योग्य असल्याचे सरकारने म्हटले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)