मराठी वाचकांसाठी अनुवादाकडे वळले

अनुवादक, साहित्यिक डॉ. उमा कुलकर्णी यांचे प्रतिपादन

कराड – मराठी भाषेबद्दल अस्मिता मनामध्ये असली तरी कन्नड भाषेतील दर्जेदार व चांगले साहित्य मराठी वाचकांना मिळावे या भावनेतून आपण अनुवादाकडे वळलो असून अनुवाद ही कला आहे. ती आयुष्यभर जोपासण्याचा मी प्रयत्न केला असून अनुवाद हा माझ्या जीवनाचा अविभाज्य भागच बनला आहे असे उद्‌गार मराठी साहित्य क्षेत्रातील अनुवादिका डॉ. उमा कुलकर्णी यांनी काढले.

कै. बाबुराव गोखले स्मारक समितीच्या वतीने कराड येथील कराड अर्बन बॅंकेच्या शताब्दी सभागृहात समाजभूषण बाबुराव गोखले स्मृतिदिनानिमित्त आयोजीत संवादु अनुवादु : एक संवाद या विषयावर डॉ. उमा कुलकर्णी बोलत होत्या. यावेळी स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कराड अर्बन बॅंकेचे अध्यक्ष डॉ. सुभाष एरम, उपाध्यक्ष समीर जोशी, बॅंकेचे संचालक वि. पु. गोखले, मुख्य कार्यकारी अधिकारी सीए. दिलीप गुरव, स्मारक समितीचे कार्याध्यक्ष विठ्ठलराव शिखरे, कार्यवाह वि. के. जोशी व माधव माने यांच्यासह कराडमधील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

यावेळी डॉ. कुलकर्णी म्हणाल्या, मराठी भाषेबद्दल माझ्या मनामध्ये अस्मिता असली तरी लग्नानंतर माझे पती विरूपाक्ष यांची भाषा कन्नड होती. लग्नानंतर पुण्यात रहायला गेले, त्यावेळी घरात कन्नड आणि बाहेर मराठी असा आमच्यात अलिखीत करारच झाला होता. मी मला आवडलेल्या मराठी पुस्तकाबद्दल व माझे पती विरूपाक्ष त्यांना आवडलेल्या कन्नड पुस्तकांबद्दलची माहिती सांगायचे यातुनच मी
ऐंशी सालापासून अनुवादाकडे वळाले.

आपल्या अनुवादाच्या प्रवासाबद्दल त्या पुढे म्हणाल्या की, कन्नडमधील ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक शिवराम कारंथ यांच्या पुस्तकाचे तनमनाच्या भोवऱ्यातफ या नावाने अनुवादित पुस्तक आले. महात्मा बसवेश्‍वरांच्या जीवनावरील गिरीष कर्नाडयांच्या तलेदंडफ या नाटकाचा अनुवाद केला. प्रसिध्द लेखिका सुधा मुर्ती, बहिरप्पा यांच्या कन्नडमधील कादंबऱ्या मी अनुवादित केल्या. ईटिव्ही साठी जवळपास चारशे भाग मी मराठीत अनुवादित केले तर आकाशवाणी साठीही मला काम करण्याची संधी मिळाली. वनिता देशपांडे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)