मराठी माणूसच उज्ज्वल महाराष्ट्र घडवू शकतो – डॉ. जाधव

पिंपरी – स्टार स्टुटंड कॉन्टेस्टच्या माध्यमातून अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेच्या प्रवेश परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना भविष्यातील शैक्षणिक कौशल्य वाढविण्याच्या संधी देत आहोत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती आणि शैक्षणिक कौशल्य वाढविणे हेच आमचे ध्येय आहे, अशी माहिती डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीच्या विश्‍वस्त डॉ. स्मितादेवी जाधव यांनी दिली. मराठी माणसात आपले स्थान निर्माण करण्याची ताकद आहे. यातूनच एक उज्ज्वल महाराष्ट्र घडू शकतो, असा विश्‍वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

डीपीयु सेंटर फॉर एक्‍सलन्सतर्फे घेण्यात आलेल्या स्टार स्टुटंड कॉन्टेस्टच्या बक्षीस वितरण सोहळ्याचे आयोजन पिंपळे गुरव येथील निळू फुले नाट्यगृहामध्ये करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी पुण्याचे माजी उपायुक्त ज्ञानदेव ठुबे, डॉ. डी. वाय. पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. रणजित पाटील, प्रशिक्षक गौरव यादव, गजेंद्र सिंग आदी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

डीपीयु सेंटर फॉर एक्‍सलन्सतर्फे इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्टार स्टुटंड कॉन्टेस्टचे आयोजन तीन टप्प्यांमध्ये करण्यात आले होते. राज्यभरातील सुमारे 10 हजार विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यशस्वी सहा विद्यार्थ्यांना सिंगापूर येथील सायन्स सेंटरला भेट व शिष्यवृत्ती दिली गेली. यामध्ये नववीतील दिव्यांश गर्ग व दहावीतील श्रीरंग सुपेकर, अनिकेत कदम, विधु रणजित, श्रीनिवास कठारे, अरमेशा मोहसीन या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तसेच 6 विद्यार्थ्यांना 21 हजार रूपयांची शिष्यवृत्ती व 11 विद्यार्थ्यांना 11 हजार रुपयांची शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. डॉ. रणजित पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शिक्षिका प्राची ढकमे यांनी केले.

अभ्यासासाठी टॅबलेटची मदत
डीपीयु सेंटर फॉर एक्‍सलन्समध्ये प्रवेश घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला “डीपीयु’ तयार केलेले टॅबलेट देखील अभ्यासाकरिता उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ज्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, अर्ज करणे आणि परीक्षा देणे सोपे होणार आहे. तसेच याव्दारे पालकांना सुद्धा आपल्या पाल्याने दररोज केलेला अभ्यास, सोडविलेले प्रश्‍न, मिळालेले मार्कस व वर्गातील उपस्थिती या सर्व गोष्टींची माहिती टॅबव्दारे प्राप्त होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)